Nokia 8.1 ची भारतातील किंमत आणि लॉन्च डेटचा झाला खुलासा
चीन मध्ये Nokia X7 च्या नावाने लॉन्च झालेला स्मार्टफोन ग्लोबली Nokia 8.1 नावाने लॉन्च केला जाईल आणि भारतात हा डिवाइस 28 नोव्हेंबरला लॉन्च केला जाऊ शकतो.
गेल्या महिन्यात HMD ग्लोबल ने चीन मध्ये आपला Nokia X7 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो फ्रंट आणि बॅक ग्लास डिजाइन, ZEISS ऑप्टिक्स आणि एज-टू-एज नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला होता. मागील X-सीरीजच्या स्मार्टफोन्स प्रमाणे Nokia X7 ग्लोबली लॉन्च केला जाईल, रिपोर्ट्नुसार हा स्मार्टफोन Nokia 7.1 Plus ऐवजी Nokia 8.1 नावाने ग्लोबली रिवील केला जाईल.
रिपोर्टनुसार भारतात Nokia 8.1 28 नोव्हेंबरला लॉन्च केला जाईल. रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन Rs 23,999 मध्ये लॉन्च केला जाईल. असे होऊ शकते कि हि या डिवाइसचा टॉप वेरीएंट (6GB रॅम आणि 128GB स्टोरेज) असेल जो चीन मध्ये Rs 26,700 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. Nokia 8.1 चे अजून दोन इतर वेरीएंट आहेत. पण भारतात या डिवाइसचे किती वेरीएंट्स लॉन्च केले जातील याबद्दल सध्यातरी काहीच सांगता येणार नाही.
Nokia 8.1 स्पेसिफिकेशन
या स्मार्टफोन मध्ये 6.18 इंचाचा डिस्प्ले असू शकतो ज्याचे रेजोल्यूशन 2246×1080 पिक्सल आहे, डिस्प्लेचा एस्पेक्ट रेश्यो 18.7:9 आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 SoC ओक्टा-कोर CPU द्वारा संचालित आहे आणि यात एड्रेनो 616 GPU आहे. आशा आहे कि Nokia 8.1 4GB रॅम+64GB स्टोरेज वेरीएंट, 6GB रॅम+64GB स्टोरेज वेरीएंट आणि 6GB रॅम+128GB स्टोरेज वेरीएंट मध्ये सादर केला जाईल.
फोटोग्राफी बद्दल बोलायचे हा या स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे ज्यात एक 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा AI सीन डिटेक्शन सपोर्ट सह येतो आणि 18 वेगवेगळे सीन डिटेक्ट करू शकतो. AI पोर्ट्रेट मोड आणि स्टूडियो लाइट इफेक्ट यांचा समावेश पण यात केला जाऊ शकतो. डिवाइसच्या फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचे तर हा 20 मेगापिक्सलचा शूटर असू शकतो.
कनेक्टिविटी पर्यायांमध्ये नोकिया 8.1 डुअल सिम कार्ड स्लॉट्स, ब्लूटूथ, 4G LTE, VoLTE आणि USB टाइप-C पोर्ट ऑफर करेल. डिवाइस मध्ये 3,500mAh ची बॅटरी देण्यात येऊ शकते जी फास्ट चार्जिंग फीचरला सपोर्ट करेल. स्मार्टफोन मध्ये 3.5mm ऑडियो सॉकेट आणि नोकिया OZO स्टीरियो रिकॉर्डिंग फीचर पण देण्यात येतील. डिवाइस एंड्राइड 8. 1 ओरियो सह लॉन्च केला जाऊ शकतो ज्याला नंतर एंड्राइड 9 पाई वर अपग्रेड केले जाईल.