Nokia 8.1 चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट भारतात झाला लॉन्च
भारतात Nokia 8.1 स्मार्टफोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट लॉन्च केला गेला आहे आणि याची किंमत Rs 29,999 ठेवण्यात आली होती.
HMD ग्लोबल ने भारतात नवीन हाई-एंड स्मार्टफोन Nokia 8.1 लॉन्च केला आहे. Nokia 8.1 भारतात नोकिया स्टोर, अमेझॉन आणि अन्य रिटेलर्स द्वारा विकत घेता येईल. स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट सह Rs 29,999 मध्ये सादर केला गेला आहे.
लेटेस्ट Nokia 8.1 स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह येतो आणि प्री-ऑर्डर साठी उपलब्ध झाला आहे, स्मार्टफोनची शिपिंग 6 फेब्रुवारी पासून केली जाईल आणि डिवाइस नव्या ब्लू आणि सिल्वर कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होईल.
HMD ग्लोबल ने एयरटेल सोबत भागेदारी करून 1TB 4G डेटा देण्याची ऑफर दिली आहे. डिवाइस विकत घेतल्यावर तीन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन आणि एक वर्षासाठी अमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन पण दिले जात आहे. हा डिवाइस वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट सह येतो आणि याचा लाभ डिवाइस विकत घेतल्यावर सहा महिन्याच्या आत घेतला जाऊ शकतो. Nokia 8.1 18-24 महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI वर पण विकत घेतला जाऊ शकतो.
Nokia 8.1 स्पेसिफिकेशंस
स्पेसिफिकेशंस बद्दल बोलायचे तर Nokia 8.1 एक एंड्राइड वन स्मार्टफोन आहे आणि त्यामुळेच हा लेटेस्ट एंड्राइड 9 पाई वर चालतो. डिवाइस मध्ये 6.18 इंचाचा प्यूरडिस्प्ले IPS LED पॅनल देण्यात आला आहे जो 2246×1080 पिक्सलचे फुल HD+ रेजोल्यूशन ऑफर करतो आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 18.7:9 आहे.
हा डिवाइस क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 710 SoC आणि एड्रेनो 616 GPU द्वारा संचालित आहे आणि हा 4GB आणि 6GB रॅम तसेच 64GB आणि 128GB स्टोरेज ऑप्शन्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर स्मार्टफोनच्या बॅकला 12 आणि 13 मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात सेकेंडरी सेन्सर टेलीफोटो लेंस असून तो झूम आणि पोर्ट्रेट मोड साठी उपयोगी पडतो. डिवाइसच्या फ्रंटला सेल्फी आणि विडियो कॉलिंग साठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटी साठी Nokia 8.1 मध्ये डुअल-सिम कार्ड स्लॉट्स, ब्लूटूथ, 4G LTE, VoLTE, USB टाइप-C पोर्ट देण्यात आले आहेत. डिवाइस मध्ये 3,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंग फीचर सह येते.