HMD ग्लोबल ने गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या त्यांच्या Nokia 7 च्या जेनरेशनचा नवीन डिवाइस लॉन्च केला आहे. कंपनी ने त्यांचा नवीन मोबाइल फोन म्हणून Nokia 7.1 लॉन्च केला आहे, हा कंपनीच्या पोर्टफोलियो मध्ये पहिला असा स्मार्टफोन आहे जो प्योरडिस्प्ले HDR 10 सपोर्ट सह लॉन्च करण्यात आला आहे.
Nokia ने आपल्या गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Nokia 7 च्या जेनेरेशनचा नवीन स्मार्टफोन Nokia 7.1 मोबाइल फोन लॉन्च केला आहे. हा कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे जो प्योरडिस्प्ले HDR 10 सपोर्ट सह सादर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या डिवाइस ची दुसरी सर्वात खास बाब म्हणजे यात असलेला स्नॅपड्रॅगन 636 त्याचबरोबर याचे एंड्राइड वन प्रोग्राम वर लॉन्च होणे आणि कार्ल झिस ऑप्टिक्स सह येणे. एंड्राइड वन प्रोग्राम अंतर्गत लॉन्च केल्यामुळे यात एक बाब स्पष्ट होते की याला वेळेवर सर्व सॉफ्टवेयर अपडेट मिळतील आणि तेही लवकर. अजूनतरी हा डिवाइस यूरोपियन बाजारांसाठी लॉन्च केला गेला असला तरी, असे बोलले जात आहे की हा 11 ऑक्टोबरला भारतात होणाऱ्या एका इवेंट मधून भारतात पण लॉन्च केला जाणार आहे.
Nokia 7.1 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
जर Nokia 7.1 मोबाइल फोनच्या डिजाईन इत्यादी बद्दल बोलायचे झाले तर हा फोन जवळपास Nokia 6.1 Plus आणि Nokia 5.1 Plus सारखाच आहे. तसेच फोन हा 6000-सीरीज च्या एल्युमीनियम फ्रेम ने बनवण्यात आला आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला एक सिंगल एल्युमीनियम ब्लॉक मिळत आहे. फोन मध्ये तुम्हाला एक 3060mAh क्षमता असलेली बॅटरी मिळेल, त्याचबरोबर यात तुम्हाला एक 5.84-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले पण मिळत आहे, जो 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह येतो.
नोकिया 7.1 मोबाइल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच यात तुम्हाला दोन वेगवेगळे रॅम आणि स्टोरेज वेरिएंट मिळतील. फोन 3GB/4GB रॅम व्यतिरिक्त 32/64GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन एंड्राइड 8.1 Oreo वर चालतो. तसेच यात तुम्हाला एंड्राइड पाई चा लवकरच अपग्रेड मिळण्याची हमी मिळते. आणि जर तुम्हाला फोनची स्टोरेज वाढवायची असेल तर तुम्ही ती माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 400GB पर्यंत वाढवू शकता.
फोन मधील कॅमेरा पाहता, Nokia 7.1 मोबाइल फोन मध्ये तुम्हाला एक 12-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा प्राइमरी म्हणून मिळेल. तसेच यात तुम्हाला एक 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा पण मिळत आहे. हे दोन्ही कॅमेरा मिळून फोनला जबरदस्त फोटोग्राफ काढण्यास मदत करतात. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे.
Nokia 7.1 ची भारतात किंमत किती असेल
जर Nokia 7.1 मोबाईल फोनच्या भारतातील किंमती बद्दल बोलायचे झाले तर, लक्षात घ्या की या फोनचा 3GB/32GB मॉडेल US मधील बाजारांत जवळपास 349 डॉलर म्हणजे जवळपास Rs 25,755 मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच हाच वेरिएंट यूरोप मध्ये 319 यूरो मध्ये विकला जाणार आहे, तसेच टॉप वेरिएंट 349 यूरो मध्ये विकला जाईल. तिथे आज पासून तुम्ही हे फोन्स प्री-आर्डर करू शकता. आणि हे फोन्स 28 ऑक्टोबर पर्यंत शिप केले जातील. जरी यांची भारतातील किंमत समोर आली नसली तरी असे बोलले जात आहे की 11 ऑक्टोबरला भारतात याच्या लॉन्च नंतर याची किंमत समोर येईल.