Nokia 7 Plus एंड्राइड वन सह होऊ शकतो लाँच, समोर आला नवीन लीक
By
Siddhesh Jadhav |
Updated on 16-Feb-2018
HIGHLIGHTS
Nokia 7 Plus मध्ये थिन-बेजेल डिस्प्ले सह डुअल Zeiss कॅमेरा आहे. सोबत यात एंड्राइड वन चा लोगो पण मागच्या बाजूस असेल.
HMD ग्लोबल MWC 2018 दरम्यान आपली या वर्षीची लाइनअप सादर करू शकते. आता या इवेंट च्या आधी Nokia 7 Plus चा एक रेंडर लीक झाला आहे. Evan Blass ने ट्वीट मधुन या फोनची रेंडर इमेज लीक केली आहे.
त्यांना बघून वाटतय की, Nokia 7 Plus थिन-बेजल डिस्प्ले सह बाजारात येईल. सोबत यात एंड्राइड वन चा लोगो पण मागच्या बाजूस असेल.
Nokia 7 Plus मध्ये डुअल वर्टीकल Zeiss कॅमेरा असेल, जो LED फ्लॅश सह येईल. या फोन मध्ये पॉवर बटन आणि वॉल्यूम रॉकर राइट एज वर आहे, या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर मागच्या बाजूस आहे.
आधी आलेल्या रिपोर्ट्स नुसार, Nokia 7 Plus मध्ये 6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असेल, ज्याचा डिस्प्ले रेजोल्यूशन 2160×1080 पिक्सल असू शकतो. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर सह 4GB रॅम असू शकतो. तसेच यात 12MP+13MP चा रियर सेंसर असण्याची शक्यता आहे.