Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco डिवाइस भारतात 20 एप्रिलला प्री-आर्डर साठी उपलब्ध झाले होते आणि आज हे स्मार्टफोंस भारतात खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोंस तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने विकत घेऊ शकता.
जसे की आपल्याला माहीत आहे की 20 एप्रिलला प्री-आर्डर साठी आलेले HMD Global चे Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco स्मार्टफोंस आज भारतात खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. Nokia 7 Plus अमेजॉन इंडिया वरून विकत घेता येईल तर Nokia 8 Sirocco स्मार्टफोन फ्लिप्कार्ट वरून विकत घेता येईल. याव्यतिरिक्त हे दोन्ही स्मार्टफोंस Nokia शॉप आणि काही निवडक ऑफलाइन स्टोर्स वरून पण घेता येतील. Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco ची किंमत Nokia 7 Plus स्मार्टफोन भारतात मिड-रेंज स्मार्टफोन च्या रुपात लॉन्च करण्यात आला आहे, याची किंमत Rs 25,999 आहे, त्याचबरोबर Nokia 8 Sirocco फोनला एक फ्लॅगशिप फोन च्या रुपात लॉन्च करण्यात आले आहे आणि याची किंमत Rs 49,999 आहे. Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco सोबत मिळत आहेत धमाकेदार ऑफर्स या दोन्ही स्मार्टफोंस सोबत तुम्हाला काही धमाकेदार ऑफर्स मिळत आहेत. Nokia 7 Plus स्मार्टफोन कंपनी कडून एयरटेल च्या Rs 2,000 च्या कॅशबॅक सह लॉन्च केला गेला आहे हा तुम्हाला 36 महिन्यानंतर मिळणे सुरू होईल. त्याचबरोबर यूजर्सना ICICI क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स सोबत 10 टक्के अतिरिक्त कॅशबॅक पण मिळत आहे. तसेच Nokia 7 Plus डिवाइस सोबत तुम्हाला एयरटेल टीवी चे सब्सक्रिप्शन पण मिळत आहे आणि हे तुमच्या साठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत फ्री आहे. Nokia 8 Sirocco डिवाइस बद्दल बोलायचे झाले तर एयरटेल कडून या डिवाइस सोबत तुम्हाला 120GB अतिरिक्त डाटा सह 31 डिसेंबर 2018 पर्यंत एयरटेल टीवी चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे, सोबतच तुम्हाला ICICI बँक च्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड वर 10 टक्क्यांचा कॅशबॅक अतिरिक्त मिळत आहे.