HMD Global ने नोकिया ब्रँडचे अनेक स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत आणि आपल्या अनेक एंड्राइड स्मार्टफोन्स साठी वेळेवर अपडेट्स रोल आउट करून एक चांगले धोरण अवलंबले आहे. हि बातमी तुम्हाला हैराण करणार नाही कारण कंपनीने जेवढे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत ते गूगलच्या एंड्राइड वन प्रोग्राम अंतर्गत लॉन्च केले गेले आहेत आणि एंड्राइड वन प्रोग्राम अंतर्गत लॉन्च झालेल्या फोन्सना अपडेट वेळेवरच मिळतात. आपली हीच खासियत कायम ठेवण्यासाठी कंपनी ने Nokia 6.1 आणि Nokia 7.1 साठी पण नवीन अपडेट जारी केले आहेत.
या नवीन अपडेट मध्ये फेब्रुवारी 2019 एंड्राइड सिक्योरिटी पॅचचा समावेश केला गेला आहे. Nokia Power User रिपोर्टनुसार, भारतात Nokia 6.1 चा TA-1089 मॉडेल नंबर आणि Nokia 7.1 च्या मॉडेल नंबर TA-1100 साठी हा अपडेट जारी केला जात आहे. Nokia 6.1 साठी जारी झालेल्या अपडेटची साइज 105.3 MB आणि Nokia 7.1 साठी 61.7 MB चा अपडेट जारी करण्यात आला आहे. यूजर्स अपडेट सेटिंग्स मध्ये चेक करू शकतात जर अजूनपर्यंत हा अपडेट मिळाला नसेल तर थोडा वेळ वाट बघा.
जर Nokia 7.1 मोबाईल फोनच्या डिजाईन इत्यादी बद्दल बोलायचे झाले तर हा जवळपास Nokia 6.1 Plus आणि Nokia 5.1 Plus सारखाच आहे. तसेच फोन 6000-सीरीजच्या एल्युमीनियम फ्रेमने निर्मित केला गेला आहे, सोबत यात तुम्हाला एक सिंगल एल्युमीनियम ब्लॉक मिळत आहे. फोन मध्ये तुम्हाला एक 3060mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, तसेच तुम्हाला यात एक 5.84-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले पण मिळत आहे, जो 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह येतो.