Nokia 6 स्मार्टफोनला भारतात मिळाला जूनचा नवीन सिक्यूरिटी अपडेट

Nokia 6 स्मार्टफोनला भारतात मिळाला जूनचा नवीन सिक्यूरिटी अपडेट
HIGHLIGHTS

Nokia 6 (2017) स्मार्टफोनला जून चा सिक्यूरिटी पॅच गूगल ने पिक्सेल आणि नेक्सस स्मार्टफोंस साठी उपलब्ध केल्याच्या दोन दिवसांमध्ये देण्यात आला आहे. या अपडेट ची साइज 148.3MB आहे.

पिक्सेल आणि नेक्सस फोन साठी जून चा एंड्रॉइड सिक्योरिटी पॅच लॉन्च केल्या नंतर दोन दिवसांनी Nokia 6 (2017), जो मागच्या वर्षी भारतात लॉन्च करण्यात आला होता, त्याला ही अपडेट मिळणे सुरू झाले. HMD Global Nokia फोन ची यूएसपी म्हणजे नियमित पणे आणि त्वरित एंड्रॉइड अपडेट्स देत आहेत. 
ग्राहकांना एकतर अपडेट डाउनलोड करण्यासाठी सांगण्यात येईल किंवा ते सेटिंग्स मध्ये जाऊन नंतर सिस्टम अपडेट मेन्यू वर जाऊन बघू शकतात. Nokia 6 (2017) अपडेट चा आकार 148.3 एमबी आहे. 

नोकीपावरस नुसार, जून सिक्यूरिटी अपडेट मीडिया फ्रेमवर्क मधील महत्वपूर्ण बग्‍स साठी एक फिक्स घेऊन येतो जो फोन ला त्यावर होणार्‍या रिमोट अटॅक्‍स पासून वाचवतो. 

HMD Global Nokia स्मार्टफोन साठी मासिक सिक्यूरिटी अपडेट आणि ओएस अपडेट जारी करत आहे. त्यांनी आपल्या लॉन्च कार्यक्रमात हे स्पष्ट केले आहे की सर्व Nokia एंड्रॉइड फोन्सना कमीत कमी दोन वर्ष ओएस अपडेट मिळतील. कंपनी ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे की नवीन ओएस रोल झाल्यावर त्यांच्या सर्व डिवाइस एंड्रॉइड पी वर अपडेट केले जातील. 

या वर्षीच्या सुरवातीला, HMD Global ने Nokia 6 स्मार्टफोन साठी एंड्रॉइड Oreo अपडेट लॉन्च केला होता. अपडेट आकाराने जवळपास 1659 एमबी होती. एंड्रॉइड Oreo सह यूजर्सना एक नवीन सेटिंग्स यूआई, पावर सेव आणि बॅकग्राऊंड प्रक्रिया प्रबंधक पण मिळाला. याव्यतिरिक्त कमी प्रकाशात इमेजिंग गुणवत्ता मध्ये पण सुधार झाला होता. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo