आज भारतात लॉन्च केले जाऊ शकतात Nokia 6 (2018), Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco आज भारतात केले जाऊ शकतात सादर, इथे बघा लाइव स्ट्रीमिंग

आज भारतात लॉन्च केले जाऊ शकतात Nokia 6 (2018), Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco आज भारतात केले जाऊ शकतात सादर, इथे बघा लाइव स्ट्रीमिंग
HIGHLIGHTS

आज नवी दिल्लीत होणार्‍या Nokia इवेंट ची लाइव स्ट्रीमिंग तुम्ही इथे बघू शकाल.

आता मागच्याच आठवड्यात HMD Global ने मीडिया ला निमंत्रण पाठविणे सुरू केले होते. कंपनी आज भारतात आपला एक लॉन्च इवेंट आयोजित करणार आहे. नवी दिल्लीत होणारा हा लाइव इवेंट 11:30 AM वाजता सुरू होणार आहे. पण कंपनी ने अजून पर्यंत अधिकृत पणे याची माहिती दिली नाही की या लॉन्च इवेंट मध्ये कंपनी कडून कोणते डिवाइस लॉन्च केले जाणार आहेत. 

पण असा अंदाज लावला जात आहे की कंपनी कडून जे डिवाइस MWC 2018 मध्ये सादर करण्यात आले होते, त्यातील काही डिवाइस आज भारतात लॉन्च केले जातील. या डिवाइस मध्ये Nokia 7 Plus, Nokia 6 (2018) आणि Nokia 8 Sirocco स्मार्टफोंस आहेत. पण एक डिवाइस वर सर्वांचीच नजर असू शकते, हा आज च्या इवेंट मध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. याचे नाव Nokia 8110 4G आहे. तसेच हे ही लक्षात असू दे की HMD ग्लोबल ने MWC 2018 मध्ये असा वादा पण केला होता कि कंपनी आपले डिवाइस भारतात एप्रिल मध्ये लॉन्च करू शकते.  
जर आज भारतात लॉन्च होणार्‍या या स्मार्टफोंस चा लॉन्च तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही या इवेंट ची लाइव स्ट्रीमिंग आपल्या घरी किंवा ऑफिस मध्ये बसुन पण बघू शकता. ही आज दुपारी 12 वाजता सुरू होईल. तुम्ही नोकिया च्या अधिकृत फेसबुक पेज वर जाऊन बघू शकता. कंपनी ने फेसबुक वर एक पब्लिक इवेंट बनवाला आहे, ज्याला "Nokia Mobile India Launch 2018" नाव दिले आहे. तुम्ही या इवेंट ची लाइव स्ट्रीमिंग बघू शकता. 
हे स्मार्टफोंस या इवेंट च्या आधी कंपनी च्या भारताच्या अधिकृत वेबसाइट वर लिस्ट करण्यात आले आहे. पण अजून पर्यंत यांची किंमत या लिस्टिंग मध्ये दिसत नाही. 
MWC 2018 दरम्यान लॉन्च करण्यात आलेले Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco चांगला कॅमेरा एक्सपीरियंस ऑफर करतो. या दोन्ही डिवाइस मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे जो Zeiss ऑप्टिक्स सह येतो. दोन्ही डिवाइस मध्ये 12 मेगापिक्सल चा प्राइमरी सेंसर आणि 13 मेगापिक्सल चा सेकेंडरी टेलीफोटो सेंसर आहे. सोबतच दोन्ही डिवाइस 2x ऑप्टिकल झूम सपोर्ट सह येतात आणि यात इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन फीचर आहे. Nokia 7 Plus मध्ये 16 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा आहे तर Nokia 8 Sirocco मध्ये 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 
स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर Nokia 7 Plus मध्ये 6 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे आणि हा डिवाइस स्नॅपड्रॅगन 660 SoC आहे. तर Nokia 8 Sirocco मध्ये 5.5 इंचाचा क्वॉड HD डिस्प्ले आहे जो बारीक बेजल्स सह येतो आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 16:9 आहे. हा स्मार्टफोन 6GB रॅम, 128GB स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 835 सह येतो. 

या दोन्ही डिवाइस व्यतिरिक्त HMD Global आपला Nokia 6 (2018) स्मार्टफोन पण भारतात सादर करू शकते. Nokia 6 (2018) मागच्या वर्षी Nokia 6 चा अपडेटेड वर्जन आहे जो तेज स्नॅपड्रॅगन 630 SoC, 3GB हा 4GB रॅम आणि 32GB किंवा 64GB स्टोरेज सह येतो. या डिवाइस मध्ये 16 मेगापिक्सल चा प्राइमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल चा सेकेंडरी कॅमेरा आहे.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo