या वर्षीच्या सुरवातीला किंवा असे म्हणूया कि फेब्रुवारी मध्ये HMD ग्लोबल ने Nokia 6 स्मार्टफोन चा नवीन वर्जन Nokia 6.1 किंवा (Nokia 6 2018) च्या रुपात लॉन्च केला होता. हा डिवाइस बार्सिलोना मध्ये झालेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस मध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर हा एप्रिल मध्ये सेल साठी आला होता. आता हा डिवाइस 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट सह यूरोप मध्ये पण लॉन्च करण्यात आला आहे.
या डिवाइस बद्दल कंपनी ने सागितले आहे की हा 4GB रॅम मॉडेल मध्ये पण आणला जाईल, तसेच याच्या 64GB स्टोरेज वर्जन पण दिसला आहे. पण हा डिवाइस आता पर्यंत सेल साठी आणण्यात आला नव्हता. आता हा डिवाइस 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट सह जर्मनी मध्ये सेल साठी उपलब्ध करण्यात आला आहे.
जर्मनी मध्ये हा डिवाइस 302 यूरो म्हणजे जवळपास 355 डॉलर मध्ये विकत घेता येईल, हा तुम्ही ComStern रिटेलर च्या माध्यमातून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही हा अमेजॉन जर्मनी च्या माध्यमातुन पण घेऊ शकता. या डिवाइस ची शिपमेंट 19 जून पासून सुरू होणार आहे.
डिजाईन बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस त्याच डिजाईन सह लॉन्च करण्यात आला आहे, पण तरीही यात खुप बदल दिसत आहेत. त्याचबरोबर हा एंड्राइड वन कार्यक्रमा सह लॉन्च केलेला स्वस्त डिवाइस आहे असे म्हणू शकतो. हा डिवाइस एल्युमीनियम च्या एकाच तुकड्या पासून बनवण्यात आला आहे.
याच्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये तुम्हाला 5.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळत आहे, हा FHD रेजोल्यूशन 1920×1080 पिक्सल सह लॉन्च करण्यात आला आहे, हा एका 16:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या स्क्रीन सह लॉन्च करण्यात आला आहे.
सध्या लॉन्च झालेल्या काही स्मार्टफोंस मध्ये 18:9 आस्पेक्ट रेश्यो चा डिस्प्ले दिसला आहे, पण तरीसुद्धा या ट्रेंड ला नोकिया ने आपल्या नवीन फोन मध्ये सामील केले नाही. डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 मोबाईल प्लॅटफार्म देण्यात आला आहे, हा एका मोठय़ा बदल म्हणू शकतो, याआधी लॉन्च केलेला डिवाइस स्नॅपड्रॅगन 430 सह लॉन्च केला गेला होता.