Nokia 6 (2018) स्मार्टफोन भारतात सेल साठी झाला उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि यासोबत मिळणार्‍या खास ऑफर्स

Updated on 06-Apr-2018
HIGHLIGHTS

Nokia 6 (2018) स्मार्टफोन मध्ये तुम्हाला काही दमदार फीचर्स मिळत आहे, तसेच भारतात हा काही ऑफर्स सह विकत घेतला जाऊ शकतो.

Nokia 6 (2018) स्मार्टफोन भारतात सेल साठी उपलब्ध केला गेला आहे, हा स्मार्टफोन मागच्या वर्षी HMD Global ने लॉन्च केलेल्या Nokia 6 स्मार्टफोन च्या अपडेटेड वर्जन च्या रुपात लॉन्च केला गेला आहे. कंपनी ने आपल्या या स्मार्टफोन सोबत काही दिवसांपुर्वी झालेल्या एका इवेंट मधून भारतात आपले Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco स्मार्टफोन पण लॉन्च केले होते. 
Nokia 6 (2018) स्मार्टफोन ची किंमत आणि लॉन्च ऑफर 
Nokia 6 (2018) स्मार्टफोन भारतात Rs 16,999 च्या किंमतीत सेल साठी उपलब्ध केला गेला आहे, या किंमतीत कंपनी ने या स्मार्टफोन मध्ये चांगले स्पेक्स आणि फीचर्स सामील केले आहेत. स्मार्टफोन स्टॉक एंड्राइड वर लॉन्च केला गेला आहे. तसेच हा तुम्ही ब्लॅक आणि सिल्वर रंगात घेऊ शकता, की आम्ही तुम्हाला याच्या लॉन्च दरम्यान सांगितले होते की तुम्ही हा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यामातून विकत घेऊ शकता. हा स्मार्टफोन तुम्ही कंपनी च्या Nokia Mobile Shop आणि काही निवडक मोबाइल आउटलेट्स मधून घेऊ शकता. 
यावर मिळणार्‍या ऑफर्स बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन एयरटेल सोबत भागीदारीत लॉन्च केला गेला आहे, याचा अर्थ असा की स्मार्टफोन सह तुम्हाला Rs 2,000 चा कॅशबॅक कंपनी च्या “मेरा पहला स्मार्टफोन” ऑफर अंतर्गत दिला जात आहे. तसेच जर तुम्ही हा स्मार्टफोन घेत असाल तर तुम्हाला एयरटेल कडून एयरटेल टीवी चे सब्सक्रिप्शन 31 डिसेंबर 2018 पर्यंत वाढवून मिळू शकते. 

Nokia 6 (2018) स्मार्टफोन चे स्पेक्स आणि फीचर्स 
Nokia 6 (2018) स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन भारतात काही बदल करून लॉन्च केला गेला आहे, त्याचप्रमाणे इतर सर्व स्मार्टफोंस मध्ये तुम्हाला काही ना काही फरक नक्की बघायला मिळेल. Nokia 6 (2018) स्मार्टफोन 6000 सीरीज च्या एल्युमीनियम पासून बनवण्यात आला आहे, ज्यामुळे हा खुप ड्यूरेबल आहे. 

सोबत या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला बोथी इफेक्ट पण मिळत आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर पण मिळत आहे, स्मार्टफोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोन फक्त 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पुर्ण चार्ज करू शकता. फोन ब्लू, ब्लॅक आणि आयरन गोल्ड रंगात भारतात सादर केला गेला आहे. 
नवीन Nokia 6 स्मार्टफोन एका 5.5-इंचाच्या IPS FHD डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे, तसेच यात 4GB ची रॅम सह 32GB/64GB इंटरनल स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहेत, सोबतच याची स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने 128GB पर्यंत वाढवीत येते. 

फोन मध्ये एक 16-मेगापिक्सल चा कॅमेरा ड्यूल टोन LED फ्लॅश सह देण्यात आला आहे, याव्यतिरिक्त यात एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण आहे. फोन मध्ये एक 3000mAh क्षमता असलेली बॅटरी पण देण्यात आली आहे.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :