या वर्षी स्मार्टफोन्स मधील सर्वात ट्रेंडिंग फीचर बद्दल बोलायचे झाले तर त्यात डिस्प्लेच्या टॉप वरील नॉच चा समावेश आहे. अॅप्पल आणि एसेंशियल नंतर इतर कंपन्यांनी पण हातोहात हा आपलासा केला आहे.
HMD ग्लोबल च्या नोकिया ब्रँड चे काही फोन्स मध्ये पण हा नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे, पण इतर कंपन्यांन प्रमाणे HMD ने पण सॉफ्टवेर सेटिंग च्या माध्यमातून नॉच हाईड करण्याचा पर्याय दिला आहे. पण, Nokia कम्युनिटी फोरम वर अनेक यूजर्स नुसार Nokia 6.1 Plus मधून हा नॉच हाईड करण्याचा फीचर काढून टाकण्यात आला होता.
फोरम वर एक मॉडरेटर ने माहिती दिली होती की, “गूगल च्या आवश्यकतेनुसार आम्हाला नॉच हाईड पर्याय काढावा लागला.” त्यानंतर हा मेसेज डिलीट करण्यात आला. त्यानंतर HMD ग्लोबल चे चीफ प्रोडक्ट ऑफिसर Juho Sarvikas ने ट्वीट करून माहिती दिली आहे की हा फीचर लवकरच इनेबल करण्यात येईल.
https://twitter.com/sarvikas/status/1037996835187511296?ref_src=twsrc%5Etfw
Nokia 6.1 Plus मध्ये एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 5.8 इंचाचा FHD+ (2280×1080) डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे आणि हा हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो ऑफर करतो. डिवाइसेज च्या फ्रंट aani बॅक ला गोरिला ग्लास 3 देण्यात आली आहे आणि हा ग्लोस मिडनाईट ब्लू, ग्लोस ब्लॅक आणि ग्लोस वाइट कलर मध्ये उपलब्ध होईल.
Nokia 6.1 Plus मध्ये ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे आणि याची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवता येते. Nokia 6.1 Plus पण एंड्राइड वन डिवाइस आहे याचा अर्थ असा की डिवाइस ला वेळच्या वेळी सिक्योरिटी अपडेट्स मिळतील आणि भविष्यात डिवाइस एंड्राइड 9 पाई वर पण अपडेट केला जाईल. Nokia 6.1 Plus आणि 5.1 Plus दोन्ही गूगल लेंस सह येतील.
Nokia 6.1 Plus च्या बॅक वर 16 आणि 5 मेगापिक्सल चा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे, तसेच डिवाइस च्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे आणि याचा अपर्चर f/2.0 आहे. कॅमेर्यात AI ला सपोर्ट पण देण्यात आला आहे जो फोटोची क्वॉलिटी आणि बोकेह इफेक्ट मध्ये सुधार करतो. डुअल सिम Nokia 6.1 Plus मध्ये 3,060mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी USB टाइप-C च्या माध्यमातून फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करेल.