जर तुम्ही Nokia 6.1 Plus स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर आता ते अजूनच सोप्पे झाले आहे. आता हा स्मार्टफोन ऑफलाइन विकत घेता येईल. लॉन्चच्या वेळी हा स्मार्टफोन फक्त फ्लिपकार्ट आणि नोकियाच्या ऑनलाइन स्टोर वरच उपलब्ध होता. पण आता Nokia 6.1 Plus ऑफलाइन स्टोर वर पण उपलब्ध करण्यात आला आहे.
Nokia 6.1 Plus भारतात Rs 15,999 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन ऑफलाइन चॅनेल्स मधून Rs 15,499 मध्ये विकत घेता येईल. HMD Global नुसार हा स्मार्टफोन देशात सर्व मोठ्या रिटेल स्टोर्स वर उपलब्ध होईल.
युजर ग्लॉस वाइट, ग्लॉस बैक आणि ग्लॉस मिडनाईट ब्लू ऑप्शन्स मध्ये कोणताही वेरीएंट विकत घेऊ शकतात. डिवाइसची अधिकृत ऑनलाईन किंमत कमी करण्यात आली आहे आणि Rs 500 च्या कपातीनंतर हा डिवाइस Rs 15,499 मध्ये उपलब्ध आहे.
Nokia 6.1 Plus मध्ये एज-टू-एज डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 5.8 इंचाचा FHD+ (2280×1080) डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 19:9 आहे आणि हा हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो ऑफर करतो. डिवाइसेज च्या फ्रंट aani बॅक ला गोरिला ग्लास 3 देण्यात आली आहे आणि हा ग्लोस मिडनाईट ब्लू, ग्लोस ब्लॅक आणि ग्लोस वाइट कलर मध्ये उपलब्ध होईल.
Nokia 6.1 Plus मध्ये ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट, 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे आणि याची स्टोरेज माइक्रो एसडी कार्ड ने 400GB पर्यंत वाढवता येते. Nokia 6.1 Plus पण एंड्राइड वन डिवाइस आहे याचा अर्थ असा की डिवाइस ला वेळच्या वेळी सिक्योरिटी अपडेट्स मिळतील आणि भविष्यात डिवाइस एंड्राइड 9 पाई वर पण अपडेट केला जाईल. Nokia 6.1 Plus आणि 5.1 Plus दोन्ही गूगल लेंस सह येतील.
Nokia 6.1 Plus च्या बॅक वर 16 आणि 5 मेगापिक्सल चा डुअल कॅमेरा देण्यात आला आहे, तसेच डिवाइस च्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे आणि याचा अपर्चर f/2.0 आहे. कॅमेर्यात AI ला सपोर्ट पण देण्यात आला आहे जो फोटोची क्वॉलिटी आणि बोकेह इफेक्ट मध्ये सुधार करतो. डुअल सिम Nokia 6.1 Plus मध्ये 3,060mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी USB टाइप-C च्या माध्यमातून फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करेल.