Nokia ने आणला हार्ट स्टीलिंग 5G स्मार्टफोन, मजबूत बॅटरीसह मिळेल आकर्षक डिझाइन

Nokia ने आणला हार्ट स्टीलिंग 5G स्मार्टफोन, मजबूत बॅटरीसह मिळेल आकर्षक डिझाइन
HIGHLIGHTS

Nokia Mobile या वर्षी नवीन Nokia X आणि G सिरीज 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 480 प्लस प्रोसेसर असेल.

Nokia 105 सर्वाधिक विकला जाणारा फीचर फोन

एकेकाळी Nokia सर्वोत्तम फोन बनवणारी कंपनी होती. मात्र, आता Samsung, Vivo आणि वन प्लस सारख्या कंपन्या यामध्ये पुढे गेल्या आहेत. Nokia अजूनही व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कंपनीने अलीकडेच प्रीमियम दिसणारे स्वस्त फोन बनवले आहेत. या प्लॅनिंगमुळे नोकियाला खूप फायदा झाला आहे. त्यानंतर 2022 मध्ये देखील Nokia असेच काहीतरी खास करणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार, Nokia Mobiles 2022 मध्ये Snapdragon 480 Plus प्रोसेसरद्वारे समर्थित अनेक Nokia X आणि G सिरीज 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे.

हे सुद्धा वाचा : Jio-Airtel-Vi वापरकर्त्यांसाठी 56 दिवसांचा प्लॅन, 84GB डेटा आणि कॉलिंग, जाणून घ्या किंमत

Nokia 5G फोन

Nokiapoweruser ने सूत्रांचा हवाला देऊन सांगितले की, Nokia Mobile या वर्षाच्या उत्तरार्धात नवीन Nokia X आणि G सिरीज 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. यापैकी अनेक स्मार्टफोन्समध्ये Snapdragon 480 Plus 5G प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. आगामी एक्स-सिरीजमधील स्मार्टफोनच्या नावांबद्दल अद्याप काही माहिती मिळाली नाही. अहवालात असे म्हटले आहे की, प्रीमियम G-सीरीज स्मार्टफोन 120Hz डिस्प्ले देऊ शकतात.

 स्मार्टफोनच्या आगामी X सिरीजमध्ये Nokia XR21, Nokia X21 आणि Nokia X11 हे फोन असण्याची शक्यता आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, हँडसेट स्नॅपड्रॅगन 480 प्लस 5G प्रोसेसरद्वारे समर्थित असेल, जे 2021 मध्ये लाँच केलेल्या स्नॅपड्रॅगन 480 पेक्षा अपग्रेड आहे.

 Nokia 105 सर्वाधिक विकला जाणारा फीचर फोन

 2022च्‍या पहिल्‍या तिमाहीमध्‍ये नोकिया आयटेलनंतर हा सर्वाधिक विकला जाणारा दुसरा टॉप फीचर फोन होता. Q1 2022 मध्ये नोकिया 105 हा सर्वाधिक विकला जाणारा फीचर फोन बनला. Nokia 105 हा एक उत्तम फोन आहे. त्याचे वजन 70 ग्रॅम आहे आणि त्याची जाडी 14.30 मिमी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये GPS, ब्लूटूथ, WiFi आणि OTG सारखे फीचर्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo