HMD ग्लोबल आपल्या साल 2018 च्या लाइनअप ला MWC 2018 दरम्यान लॉन्च करण्यासाठी तयार आहे. आता पर्यंत आलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच Nokia 1, Nokia 7 Plus आणि Nokia 8 Sirocco लॉन्च करेल.
पण आता NokiaPowerUser च्या एका नव्या रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे कंपनी MWC मध्ये Nokia 4 ला पण सादर करू शकते. Nokia 4 च्या बाबतीत apk टियरडाउन च्या माध्यमातून पण काही माहिती समोर आली होती.
रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे की कंपनी Nokia 3 ला आता बंद करू शकते आणि त्याजागी Nokia 4 आणू शकते. पण अजूनतरी Nokia 4 च्या स्पेक्स बद्दल ईतर कोणतीही माहिती समोर आली नाही. पण एवढ नक्की समाजलय की हा फोन स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर सह लॉन्च होऊ शकतो.