HMD ग्लोबल ने फेब्रवारीत आपल्या Nokia 3.2, Nokia 9 Pureview स्मार्टफोन्स सह Nokia 4.2 पण सादर केला होता. आता भारतात Nokia 4.2 लॉन्चची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल फोन 7 मे ला भारतात लॉन्च केला जाईल. स्मार्टफोनची मुख्य खासियत याचा डुअल रियर कॅमेरा, स्नॅपड्रॅगॉन 439 SoC, 5.71 इंचाचा HD+ 19:9 डिस्प्ले इत्यादी म्हणता येतील.
Nokia 4.2 च्या लॉन्चसाठी आलेल्या टीजर मध्ये पॉवर बटण मधील LED नोटिफिकेशन लाइट आणि डेडिकेटेड गूगल असिस्टेंट बटण दिसत आहे. अजूनतरी Nokia 4.2 च्या भारतीय किंमतीबद्दल कोणतीही बातमी समोर आलेली नाही पण US मध्ये डिवाइसचा 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज वेरिएंट US$ 169 (जवळपास Rs 12,005) आणि 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट US$ 199 (जवळपास Rs 14,135) मध्ये सादर केला गेला होता. स्मार्टफोन ब्लॅक आणि पिंक सॅण्ड कलर मध्ये आला होता.
https://twitter.com/NokiamobileIN/status/1124352457897734145?ref_src=twsrc%5Etfw
Nokia 4.2 मध्ये 5.71 इंचाचा HD+ फुल व्यू डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 1520 x 720 पिक्सल आहे आणि हा 19:9 एस्पेक्ट रेश्योचा डिस्प्ले आहे ज्याच्या वर एक वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे आणि सोबत यात 2.5D कर्व्ड पण देण्यात आला आहे. स्मार्टफोन क्वालकॉम ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर सह येतो आहे जो 1.95GHz वर क्लोक्ड आहे आणि हा एड्रेनो 505 GPU सह पेयर केला गेला आहे. स्मार्टफोन मध्ये 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज तसेच 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रो SD कार्डने 400GB पर्यंत वाढवता येते.
Nokia 4.2 एंड्राइड 9.0 पाई वर चालतो. ऑप्टिक्स बद्दल बोलायचे तर डिवाइसच्या मागे 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे जो PDAF f/2.2 अपर्चर, LED फ्लॅश सह येतो आणि हा 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेरा सह पेयर केला गेला आहे. स्मार्टफोनच्या मागे एक रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि हा 3000mAh च्या बॅटरी सह येतो. कनेक्टिविटी साठी डिवाइस डुअल 4G VoLTE, ब्लूटूथ 4.2, GPS/GLONASS, WiFi 802.11 b/g/n, माइक्रो USB सपोर्ट सह येतो.