मोबाईल निर्माता कंपनी नोकिया पुन्हा एकदा दणक्यात मोबाईल जगतात कम बॅक करण्याच्या तयारीत आहे. नोकिया C1 स्मार्टफोनच्या पाठोपाठ आता नोकिया आणखी एक नवीन स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. नोकियाचा हा नवीन 1008 स्मार्टफोन ३८ मेगापिक्सेलसह येत आहे, हा नवीन स्मार्टफोन नोकिया लूमिया किंवा नोकिया कॅटवॉक नावाने ओळखला जाऊ शकतो, असे अफवांनुसार सांगण्यात येत आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये ३८ मेगापिक्सेलचा कॅमेरा सेंसर दिला जाईल, जो ३६० डिग्रीपर्यंत हाय क्वालिटीचे फोटो कॅप्चर करेल. नोकिया 1008 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा विंडोज 8 ब्लू ओएसवर चालेल. पण अॅनड्रॉईड संबंधी लोकांची वाढती मागणी पाहता, हा अॅनड्रॉईड ओएसवरसुद्धा चालेल.
तसेच ह्याच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 2GB ची रॅम, 32GB ची रोम असेल. तसेच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 600 प्रोसेसरवर चालवला जाईल. ह्यात 4.5 इंचाची HD डिस्प्ले, ड्यूल LED फ्लॅश, वायरलेस चार्जिंगसह देण्यात येईल.
आपल्या सर्वांना माहितच असेल की, मायक्रोसॉफ्टने नोकियाला विकत घेतले होते आणि नोकियाला सांगितले होते की, ते आपल्या नावाने फोन बनवू शकत नाही, त्यामुळे मायक्रोसॉफ्ट नोकिया नावाने फोन्स बनवत राहिला. मात्र आता नोकिया लवकरच त्यांच्या कचाट्यातून बाहेर पडणार आहे आणि करार संपताच कदाचित हा C1 स्मार्टफोन नोकियाचा पहिला स्मार्टफोन असेल. हा स्मार्टफोन देखील अॅनड्रॉईड आणि विंडोज दोघांवरही काम करेल.
हेदेखील वाचा – अखेरीस भारतात लाँच झाला मोटो X फोर्स स्मार्टफोन
हेदेखील पाहा – हे ७ हायपरलोकल अॅप्स तुम्ही इन्स्टॉल केलेच पाहिजे