नवे Nokia 3210, Nokia 235 4G आणि Nokia 220 4G फोन भारतात लाँच, 3,000 रुपयांच्या बजेटमध्ये आहे किंमत
HMD ने 25 वा वर्धापन दिन साजरा करत Nokia 3210 एका नवीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला.
कंपनीने Nokia 235 4G आणि Nokia 220 4G फोन सादर केले.
Nokia 220 4G फोनमध्ये तुम्हाला प्री-लोड केलेले UPI ॲप मिळेल.
HMD ग्लोबल ने भारतात पुन्हा एकदा Nokia 3210 फोन लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 25 वा वर्धापन दिन साजरा करत कंपनीने हा फोन एका नवीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. एवढेच नाही तर, या फोनसोबत कंपनीने Nokia 235 4G आणि Nokia 220 4G देखील सादर करण्यात आले आहेत. या फीचर फोन्समध्ये तुम्हाला इन-बिल्ट UPI, कॅमेरा आणि क्लासिक स्नेक गेम सारखे फीचर्स मिळतात. जाणून घेऊयात या फोनची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सशी संबंधित सर्व तपशील-
Also Read: नव्या रंगात भारतात लाँच झाले Redmi Note 13 Pro 5G आणि Note 13 5G, जाणून घ्या किंमत
HMD च्या नव्या स्मार्टफोन्सची भारतीय किंमत
Nokia 3210: कंपनीने Nokia 3210 ला 3,999 रुपये किमतीत लॉन्च केला आहे. हा फोन स्कुबा ब्लू, ग्रंज ब्लॅक आणि Y2K गोल्ड कलरऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Nokia 235 4G: या स्मार्टफोनची किंमत 3,749 रुपये आहे.
Nokia 220 4G: या फोनची किंमत 3,249 रुपये आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री HMD.com आणि Amazon वर सुरू करण्यात आली आहे.
Nokia 3210
Nokia 3210 मध्ये 2.4 इंच लांबीचा QVGA डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 128MB स्टोरेज आहे, जे microSD कार्डद्वारे 32GB पर्यंत वाढवता येते. परफॉर्मन्ससाठी हा फोन Unisoc T107 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 2MP रियर कॅमेरा आहे. यासोबत LED फ्लॅशला स्थान देण्यात आले आहे. फोनमध्ये 1450mAh ची काढता येण्याजोगी बॅटरी आहे.
या बॅटरीसह फोन एका चार्जवर 9.8 तासांपर्यंत टॉक-टाइम मिळतो, असा कंपनीचा दावा आहे. इतर विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये YouTube, YouTube म्युझिक सारख्या ॲपसाठी USB टाइप-C सपोर्ट आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या वापरकर्त्यांना YouTube Music चे सबस्क्रिप्शन मिळेल.
Nokia 235 4G आणि Nokia 220 4G
Nokia 235 4G फोनमध्ये 2.8 इंच लांबीचा IPS डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 2MP रियर कॅमेरा आहे. हे दोन्ही फीचर फोन S30+ ऑपरेटिंग सिस्टमवर लाँच केले गेले आहेत, जे Unisoc T107 प्रोसेसरवर चालतात. या दोन्ही मोबाईलमध्ये 64MB रॅम आणि 128MB इंटरनल स्टोरेज मिळेल. Nokia 220 4G फोन 2.8 इंच लांबीच्या IPS डिस्प्लेसह येतो. या फोनमध्ये तुम्हाला प्री-लोड केलेले UPI ॲप मिळेल, ज्याद्वारे तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता. या फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे. हे फोन पीच आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये सादर केले गेले आहेत.
या फीचर फोन्समध्ये तुम्हाला इन-बिल्ट UPI, कॅमेरा आणि क्लासिक स्नेक गेम सारखे फीचर्स मिळतात. हे फोन पीच आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये सादर केले गेले आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile