बिल्ट-इन UPI ​​पेमेंट फीचरसह नवा Nokia 3210 4G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

बिल्ट-इन UPI ​​पेमेंट फीचरसह नवा Nokia 3210 4G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Nokia 3210 4G फीचर फोन भारतीय बाजारात लाँच

Nokia 3210 4G फीचर फोन 3,999 रुपयांना उपलब्ध

हा फीचर फोन बिल्ट-इन UPI ​​फीचरसह येतो. तुम्ही या फोनद्वारे स्कॅन करून पेमेंट करू शकता.

Nokia 3210 4G फीचर फोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा फोन प्रत्येक ग्राहकाच्या बजेटमध्ये येणार आहे. हा HMD कडून नवीन रेट्रो डिझाइन केलेला फीचर फोन आहे, जो बिल्ट-इन UPI पेमेंट फीचर्ससह येतो. विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फीचर फोनमध्ये तुम्हाला यूट्यूब, यूट्यूब शॉर्ट्स, न्यूज आणि गेम्ससाठी समर्पित प्रीलोडेड ॲप्स मिळतील.

Also Read: BSNL Plan: कंपनीच्या स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल 28 दिवसांची वैधता, जाणून घ्या किंमत आणि अप्रतिम बेनिफिट्स

Nokia 3210 4G ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने Nokia 3210 4G फीचर फोन 3,999 रुपये किमतीत लाँच केला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन तुम्ही Amazon आणि HMD ई-स्टोअरवरून खरेदी करू शकता. हा फोन तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.

Nokia 3210 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आम्ही तुम्हाला सांगतो की, Nokia 3210 4G फोनमध्ये 2.4 इंच लांबीची QVGA स्क्रीन आहे. याशिवाय, हा फोन UniSoC T107 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 64MB रॅम आणि 128MB स्टोरेज आहे. तसेच, फोनमध्ये मायक्रो SD कार्डचा सपोर्ट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फोनचे स्टोरेज 32GB पर्यंत वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 2MP रियर कॅमेरा आहे, त्यासोबत LED फ्लॅशला स्थान देण्यात आले आहे.

nokia 3210 4g

पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 1,450mAh काढण्यायोग्य बॅटरी आहे. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आहे. हा फोन एका चार्जवर 9.8 तासांचा टॉकटाइम देतो, असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक आहे. त्याबरोबरच, यात MP3 प्लेयर आणि FM रेडिओ त्याच्यासोबत आहे.

खास फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फीचर फोन बिल्ट-इन UPI ​​फीचरसह येतो. तुम्ही या फोनद्वारे स्कॅन करून पेमेंट करू शकता. याशिवाय, फोनमध्ये यूट्यूब, यूट्यूब शॉर्ट्स, न्यूज आणि गेम्स सारखे प्रीलोडेड ॲप्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये क्लासिक स्नेक गेम देण्यात आला आहे. इतकेच नाही तर जुन्या फीचर फोनचा फील देण्यासाठी कंपनीने या फोनमध्ये क्लासिक स्नेक गेमचाही समावेश केला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo