Nokia 3.1, Nokia 5.1 आणि Nokia 8 Sirocco च्या किंमती झाल्या कमी
नोकिया च्या फ्लॅगशिप 8 Sirocco मोबाईल फोनच्या किंमतीती HMD ने Rs. 13,000 पर्यंतची कपात केली आहे आणि Nokia 3.1 ची किंमत Rs. 1,000 आणि Nokia 5.1 ची किंमत Rs. 1,500 ने कमी झाली आहे.
या सणांच्या सीजन मध्ये HMD ग्लोबल ने निवडक स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. एंट्री-लेवल मोबाईल फोन्सच्या किंमतीती कंपनी ने Rs. 1,000 आणि Rs. 1,500 दरम्यान कपात केली आहे. तसेच फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या प्राइस मध्ये थेट Rs. 13,000 ची सूट देण्यात आली आहे.
एंट्री-लेवल स्मार्टफोन Nokia 3.1 च्या 3GB रॅम वेरीएंट च्या प्राइस मध्ये Rs. 1,000 ची सूट मिळाल्यामुळे याची किंमत Rs. 11,999 पासून कमी होऊन Rs. 10,999 झाली आहे. Nokia 5.1 च्या 3GB रॅम वेरीएंटच्या किंमतीती Rs. 1,500 ची सूट मिळाल्यामुळे याची किंमत Rs. 12,999 झाली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनी ने मे मध्ये Nokia 2.1 सोबत सादर केले होते.
Nokia 6.1 भारतात दोन वेरीएंट्स 3GB रॅम आणि 4GB रॅम वेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. दोन्ही वेरीएंटच्या किंमतीती क्रमश: Rs. 1,500 आणि Rs. 1,000 ची सूट देण्यात आली आहे. आता डिवाइस क्रमश: Rs. 13,499 आणि Rs. 16,499 मध्ये विकत घेता येईल. लॉन्चच्या वेळी हे फोन्स Rs. 16,999 आणि Rs. 18,999 मध्ये सादर करण्यात आले होते आणि काही दिवसांनी डिवाइसची किंमत Rs. 1,500 ने कमी करण्यात आली होती.
फ्लॅगशिप फोन Nokia 8 Sirocco बद्दल बोलायचे झाले तर कंपनी ने भारतात हा फोन एप्रिल मध्ये लॉन्च केला होता. लॉन्चच्या वेळी या मोबाईल फोनची किंमत Rs. 49,999 ठेवण्यात आली होती पण या फोनची किंमत पण Rs. 13,000 ने कमी करण्यात आली आहे ज्यामुळे याची किंमत Rs. 36,999 झाली आहे.