Nokia ने आपला स्वस्त फोल्डेबल फोन लाँच केला आहे. होय, कंपनीने Nokia 2780 Flip हा आपला नवीन फ्लिप फोन म्हणून जागतिक बाजारात लाँच केला आहे. हा HMD ग्लोबलचा नवीनतम फीचर फ्लिप फोन आहे. हा डिवाइस नोकिया 2760 फ्लिप सारखाच आहे, जो कंपनीने या वर्षी मार्चमध्ये लॉन्च केला होता. चला तर मग Nokia 2780 Flip ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बघुयात …
हे सुद्धा वाचा : Amazfit Band 7 लवकरच भारतात होणार लाँच, बघा जबरदस्त फीचर्स
Nokia 2780 Flip ची किंमत $90 म्हणजेच अंदाजे 7,450 रुपये आहे. ते लाल आणि निळ्या रंगात सादर केली जाते. 15 नोव्हेंबरपासून अमेरिकेत त्याची विक्री सुरू होईल.
Nokia 2780 Flip मध्ये 2.7-इंच लांबीचा TFT डिस्प्ले आणि बाहेरील बाजूस 1.77-इंच लांबीचा सेकंडरी डिस्प्ले आहे. बाहेरील डिस्प्ले टाइम, कॉलर आयडी आणि इतर अपडेट्स दाखवतो. सेकंडरी स्क्रीनवर LED फ्लॅशसह 5MP कॅमेरा सेन्सर देखील आहे. फिचर फ्लिप फोनमध्ये क्लॅमशेल डिझाइन आणि T9 कीबोर्ड आहे.
नोकिया 2780 फ्लिप क्वालकॉम 215 प्रोसेसरसह सुसज्ज आहे ज्यामध्ये 1.3GHz क्लॉक केलेला क्वाड-कोर CPU आणि 150Mbps च्या पीक डाउनलिंक स्पीडसह X5 LTE मॉडेम समाविष्ट आहे. फोनमध्ये 4GB रॅम आणि 512MB स्टोरेज आहे. डिव्हाइस 1450mAh रिमूव्हेबल बॅटरी युनिटसह येते.