digit zero1 awards

Nokiaच्या बटन फ्लिप फोनमध्ये जोडण्यात आले Special Feature, आता सहज करता येईल UPI पेमेंट। Tech News  

Nokiaच्या बटन फ्लिप फोनमध्ये जोडण्यात आले Special Feature, आता सहज करता येईल UPI पेमेंट। Tech News  
HIGHLIGHTS

आता वापरकर्ते Nokia 2660 फ्लिप फोनद्वारे UPI पेमेंट देखील करू शकतील.

Nokia 2660 फ्लिप फोनमध्ये UPI 'स्कॅन अँड पे' फिचर जोडण्यात आले आहे.

फोन 4,499 रुपयांना ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करता येईल.

Nokiaकडे एक आकर्षक बटन फ्लिप फोन आहे, ज्यामध्ये एक नवीन आणि महत्त्वाचे फिचर जोडण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, UPI पेमेंटचा कल भारतात काळानुरूप वाढत चालला आहे. आजकाल लोक प्रत्येक गोष्टीसाठी UPI पेमेंट वापरतात. अनेक वेळा इंटरनेटचा वेग चांगला नसल्यामुळे लोकांना पेमेंट करण्यात अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच, लोकांकडे स्मार्टफोन नसल्यास UPI पेमेंट सुविधेचा लाभ घेता येत नाही. मात्र, आता ही सुविधा अनेक फीचर फोनमध्ये मिळणार आहे, त्यापैकी एक ‘Nokia 2660 फ्लिप’ फोन आहे. होय, आता वापरकर्ते Nokia 2660 फ्लिप फोनद्वारे UPI पेमेंट देखील करू शकतील.

Nokia 2660 Flip द्वारे UPI पेमेंट

NOKIA 2660

HMD ग्लोबल ने घोषणा केली आहे की, त्यांनी Nokia 2660 फ्लिप फोनमध्ये UPI ‘स्कॅन अँड पे’ फिचर जोडले आहे. आता लोक या फोनद्वारे UPI पेमेंट देखील करू शकतील. हे वापरकर्त्यांना एक बटण दाबून सुरक्षित आणि डिजिटल व्यवहार करण्यास परवानगी देईल.

UPI ‘स्कॅन अँड पे’ फिचर

आम्ही तुम्हाला सांगतो की, Nokia च्या अनेक फीचर फोनमध्ये ‘UPI स्कॅन अँड पे’ फीचर उपलब्ध आहे. आता कंपनीने नोकिया 2660 फ्लिप वापरकर्त्यांसाठी एक सॉफ्टवेअर अपडेट आणले आहे. या अपडेटसह आता या फोनमध्ये UPI स्कॅन आणि पे फीचर देखील उपलब्ध झाले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, या यादीत कंपनीचा बजेट फोन Nokia 110 2G देखील सामील आहे.

Nokia 2660 Flip

NOKIA 2660

यात 2.8 इंच लांबीचा मोठा डिस्प्ले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G सिम कार्ड आणि VoLTE आहे. यात 1450mAh बॅटरी आहे. फोनची बॅटरी एका चार्जवर संपूर्ण दिवस टिकू शकते. स्टोरेज वाढवण्यासाठी यात मायक्रो SD कार्ड स्लॉट देखील आहे. फोनमध्ये इमर्जन्सी बटणही देण्यात आले आहे. हे तुम्हाला इमर्जन्सीमध्ये ताबडतोब पाच प्री-सेव्ह केलेल्या संपर्कांना कॉल करण्यास परवानगी मिळणार आहे.

HMD Global चा Nokia 2660 Flip गेल्या वर्षी भारतीय बाजारात लाँच झाला होता. हे पॉप पिंक आणि लश ग्रीन या दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. फोनची किंमत 4,499 रुपये असून हा फोन तुम्हाला लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo