नव्या रुपरंगात लाँच झाला 2 डिस्प्लेसह येणारा Nokia 2660 फ्लिप फोन, जाणून घ्या किंमत
Nokia 2660 फ्लिप फोन पॉप पिंक आणि लश ग्रीनमध्ये कलरमध्ये लाँच
स्मार्टफोनची किमंत सुमारे 7 हजार रुपये
नोकिया 2660 फ्लिप फोन आधीच अनेक मार्केटमध्ये उपलब्ध
Nokia ने फ्लिप फोन Nokia 2660 लाँच केला आहे, जो पॉप पिंक आणि लश ग्रीनमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनचे कलर व्हेरिएंट दिसायला अतिशय आकर्षक आहेत. हा ड्युअल डिस्प्ले असलेला 4G फोन आहे. बघुयात फोनची किंमत आणि सर्व फीचर्सची माहिती पुढे बघुयात.
Nokia 2660 ची किंमत
नोकिया 2660 फ्लिप फोन कंपनीने युरोपमध्ये 79.90 युरो म्हणजेच सुमारे 7 हजार रुपयांमध्ये लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट तसेच इतर ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. नवीन पॉप पिंक आणि लश ग्रीनच्या कलर व्हेरियंटदेखील खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.
Nokia 2660 चे स्पेक्स
Nokia 2660 मध्ये डुअल डिस्प्ले देण्यात आला आहे. मेन स्क्रीन 2.8 इंच तर सेकंडरी स्क्रीन 1.77 इंच लांबीची आहे. फोनमध्ये 4G कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. तसेच, यात Unisoc T107 प्रोसेसर आहे. फोनमध्ये मनोरंजनासाठी वायरलेस FM आणि MP3 प्लेयर इत्यादी काही ऍप्स देखील आहेत.
नोकिया 2660 फ्लिप फोनमध्ये 1,480mAh बॅटरी आहे. यात चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट आहे. फोनमध्ये मागील बाजूस 0.3MP चा कॅमेरा LED फ्लॅशसह आहे. यात त्वरित कॉलिंगसाठी एमर्जन्सी फिचर देखील आहे, ज्यामध्ये 5 पर्यंत संपर्क सेव करता येतील. नोकिया 2660 फ्लिप फोन आधीच अनेक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आता कंपनीने नव्या कलर व्हेरिएंटसह पुन्हा लाँच केले आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile