48MB रॅम, 128MB स्टोरेजसह Nokia 2660 फ्लिप फोन भारतात लाँच, किंमत 4,699 रुपये

48MB रॅम, 128MB स्टोरेजसह Nokia 2660 फ्लिप फोन भारतात लाँच, किंमत 4,699 रुपये
HIGHLIGHTS

Nokia 2660 फ्लिप फोन भारतात लाँच

नव्या फोनची किंमत 4,699 रुपये

फोन 48MB रॅम + 128MB स्टोरेजसह उपलब्ध

नोकिया 2660 फ्लिप भारतात लाँच झाला आहे. फ्लिप फोन Nokia च्या सीरीज 30+ OS वर चालतो. यात 4G LTE कनेक्टिव्हिटी आहे. फोनमध्ये QVGA रिजोल्यूशनसह 2.8-इंच लांबीचा प्रायमरी डिस्प्ले आणि QQVGA रिझोल्यूशनसह 1.77-इंच लांबीचा आऊटर डिस्प्ले आहे. हे उपकरण Unisoc T107 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, 48MB RAM आणि 128MB इंटरनल स्टोरेजसह पेयर केलेले आहेत. Nokia 2660 Flip तीन कलर ऑप्शन्समध्ये विकला जाईल.

हे सुद्धा वाचा : काळजी मिटली ! इंटरनेटशिवायही Gmail वरून काही सेकंदात Email पाठवता येईल, बघा सोपा मार्ग…

नोकिया 2660 फ्लिपचेस्पेसिफिकेशन्स 

नोकिया 2660 फ्लिप ड्युअल-सिम (नॅनो) सह येतो, जो 4G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. फ्लिप फोन सिरीज  30+ OS वर चालतो. यात QVGA रिजोल्यूशनसह 2.8-इंच लांबीचा प्रायमरी डिस्प्ले आणि QQVGA रिझोल्यूशनसह 1.77-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. यात Unisoc T107 प्रोसेसरचे समर्थन आहे, तर 48MB RAM आणि 128MB इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 32GB पर्यंत वाढवता येते. यात LED फ्लॅशसह 0.3 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे.

nokia 2660 flip

नोकिया 2660 फ्लिपमध्ये ब्लूटूथ v4.2, मायक्रो- USB 2.0 पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅकसाठी समर्थन आहे. यात 2.75W चार्जिंग सपोर्टसह रिमूव्हेबल बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन एका 4G सिमवर जास्तीत जास्त 24.9 दिवसांचा स्टँडबाय टाइम आणि जास्तीत जास्त 6.5 तासांचा टॉकटाइम देऊ शकतो. फोनचे वजन सुमारे 123 ग्रॅम आहे.

नोकिया 2660 फ्लिप भारतीय किंमत 

नोकिया 2660 फ्लिपची भारतात 48MB रॅम + 128MB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 4,699 रुपये आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, सध्या हा फोन नोकियाच्या वेबसाइटवर ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. नोकियाने पहिल्यांदा या वर्षी जुलैमध्ये फ्लिप फोन सादर केला होता. या महिन्याच्या सुरुवातीला, नोकिया 2660 फ्लिप भारत वगळता काही निवडक बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आला होता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo