NOKIA 2660 FLIP च्या रिलीझसह, NOKIA युनायटेड किंगडममधील आपल्या जुन्या ग्राहकांना लक्ष्य करत आहे. नवीन फोल्डेबल नोकिया फोन एक मोठा कीपॅड, मोठ्या कंट्रोल की आणि सुधारित इंटरफेसने सुसज्ज आहे. नोकिया 2660 फ्लिपमध्ये या फीचर्ससह वृद्ध लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचे नोकिया मोबाईल्सचे उद्दिष्ट आहे. हे श्रवणशक्ती कमी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हिअरिंग एड कंपॅटिबिलिटी (HAC) फिचरसह येते.
हे सुद्धा वाचा : प्रतीक्षा संपली ! 7 सप्टेंबरला iPhone 14 लाँच होण्याची शक्यता, नवीन Apple Watch देखील होणार लाँच
नोकिया फ्लिप फोनमध्ये 1,450mAh बॅटरी आहे. फोन रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो, जी पॉवर सेव्हिंग ओएस आहे. एका चार्जवर डिव्हाइस अनेक दिवस टिकतो, असे कंपंनीने सांगितले आहे. Nokia 2660 Flip चा स्टँडबाय टाइम बऱ्याच आठवड्यांपर्यंत आहे.
2660 फ्लिप फोन फ्लिप करण्यासाठी आणि कॉल मिळवण्यासाठी उत्कृष्ट एर्गोनॉमिक्स ऑफर करते. वृद्धांना मायक्रोफोन आणि इअरपीसच्या प्लेसमेंटबद्दल काळजी करण्याची गरज नाही. फोनमध्ये आपत्कालीन कॉल बटण आहे ज्याचा वापर आपत्कालीन परिस्थितीत आपल्या प्रियजनांशी संपर्क साधण्यासाठी केला जाऊ शकतो.
नोकिया 2660 फ्लिप नोकिया चार्जिंग क्रॅडलद्वारे चार्ज होईल. फोन €64.99 म्हणजेच 5,228 रुपयांमध्ये विकला जातो. नोकिया 2660 फ्लिपची विक्री ऑगस्टच्या अखेरीस सुरू होईल. फोन ब्लू, ब्लॅक आणि रेड या तीन कलर ऑप्शनमध्ये येईल.