मायक्रोसॉफ्टने आपले दोन नवीन स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत. हे फीचर फोन्स नोकिया 230 आणि नोकिया 230 ड्यूल सिमच्या नावाने बाजारात आणले आहेत. ह्या स्मार्टफोन्सची किंमत कंपनीद्वारा ५५ डॉलर म्हणजेच जवळपास ३,७०० रुपये ठेवण्यात आली आहे.
हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतात पुढील महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध केले जातील. त्याचबरोबर आतापर्यंत नोकिया 230 आणि नोकिया 230 ड्यूल सिम फोन्स कंपनीच्या साइटवर लिस्ट केले गेले नाही.
ह्या फोन्सच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, कंपनीने ह्या फीचर फोन्सला “प्रीमियम क्वालिटी इंटरनेट फीचर फोन” असे नाव दिले आहे. दोन्ही फोन्समध्ये आपल्याला 2MP चा रियर कॅमेरा आणि फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर त्याचा लुक आणि रचना खूप चांगली आहे.
ह्यांच्या तपशीलामध्ये जास्त फरक नाही. जर सर्वात मोठा फरक दिसत असेल, तर तो सिंगल आणि ड्यूल सिम स्लॉट आहे. नोकिया 230 ड्यूल सिममध्ये दोन सिम वापरले जाऊ शकतात. हे दोन्हीही हँडसेट नोकिया सीरिज 30+ ओएसवर काम करतात. त्याचबरोबर ह्याच्या अन्य तपशीलाबाबत बोलायचे झाले तर, ह्या फोन्समध्ये 2.8 इंचाची QVGA 240×320 पिक्सेलची LCD डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्याची मेमरी आपण ३२जीबीपर्यंत वाढवू शकता. ह्या फोन्सच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्यात GPS/EDGE, ब्लूटुथ ३.०, मायक्रो-USB आणि 3.5mm चा ऑडियो जॅकसुद्धा दिला गेला आहे. त्याशिवाय ह्या फोन्समध्ये 1200mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे, जी कपंनीनुसार २३ तासापर्यंत टॉकटाईम देण्यास सक्षम आहे.