बजेट स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध Nokia कंपनी भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच बजेट रेंजमध्ये दोन नवे 5G स्मार्टफोन्स आणण्याच्या तयारीत आहे. Nokia आपल्या G सिरीजमध्ये नवीन स्मार्टफोन दाखल करेल. खरं तर, HMD Global वर Nokia G42 5G आणि Nokia G310 5G चे हे दोन्ही आगामी डिव्हाइस ब्लूटूथ SIG डेटाबेसमध्ये स्पॉट केले गेले आहेत. यासह त्यांची प्रमुख फीचर्स देखील उघड झाली आहेत.
मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने या स्मार्टफोन्सच्या अधिकृत लाँचबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. हे दोन्ही नोकिया फोन ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशन साइटवर TA-1591/TA-1581 आणि TA-1573 या मॉडेल नंबरसह लिस्टेड आहेत.
लीकनुसार, या स्मार्टफोनचे डिझाईन आणि फीचर्स जवळपास एकसारखे असतील. यात 6.5-इंच लांबीचा LCD HD+ डिस्प्ले मिळेल. तसेच, ते हाय रिफ्रेश रेटचे समर्थन करेल. स्मार्टफोन्समध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन दिले जाईल, अशी माहिती मिळाली आहे. डिस्प्लेसह प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आले आहे.
आगामी स्मार्टफोन्समध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. खरं सांगायचे झल्यास, हा क्वालकॉमचा बजेट 5G प्रोसेसर आहे. हा प्रोसेसर गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. नोकिया G सीरीजचे हे आगामी स्मार्टफोन ब्लूटूथ 5.1 कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येतील, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, एक लक्षात घ्या की, Nokia ने अधिकृतरित्या या सर्व फीचर्सबद्दल अद्याप काही माहिती दिलेली नाही.