Nokia 130 Music and Nokia 150: 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवे फोन्स लाँच, बघा जबरदस्त फीचर्स

Nokia 130 Music and Nokia 150: 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवे फोन्स लाँच, बघा जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

Nokia 130 Music आणि Nokia 150 नवीन फिचर फोन्स लाँच

Nokia 130 Music ची सुरुवातीची किंमत 1,849 रुपये

नोकिया 130 म्युझिक पावरफुल लाउडस्पीकर आणि MP3 प्लेयरने सुसज्ज आहे.

HMD Global नोकिया फोन सादर करणाऱ्या कंपनीने अलीकडेच आपल्या लाइनअपमध्ये दोन नवीन फीचर फोन लाँच केले आहेत. यामध्ये Nokia 130 Music आणि Nokia 150 चा समावेश करण्यात आला आहे. या फोन्समध्ये उत्तम स्पीकर, मजबूत बिल्ड आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी उपलब्ध आहे. दोन्ही स्मार्टफोन 3000 रुपयांच्या अंतर्गत येतात. जाणून घ्या नव्या फोन्सबद्दल संपूर्ण तपशील आणि किंमत. 

Nokia 130 Music ची किंमत 

Nokia 130 म्युझिक तीन तर ऑप्शन्समध्ये येतो. ज्यामध्ये डार्क ब्लू, पर्पल आणि लाइट गोल्ड कलर समाविष्ट आहे.  तुम्ही फोनचे डार्क ब्लू आणि पर्पल व्हेरिएंट 1,849 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर, लाइट गोल्ड व्हेरियंट 1949 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे भारतातील रिटेल स्टोअर्स, नोकियाची अधिकृत वेबसाइट आणि ऑनलाइन भागीदार स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Nokia 150 ची किंमत 

Nokia 150 देखील तुम्ही तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यात चारकोल, ब्लूईश आणि रेड कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तुम्ही हा फोन फक्त 2,699 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Nokia 130 Music

Nokia 130 Music मध्ये 2.4-इंच लांबीचा डिस्प्ले आणि युजर-फ्रेंडली कीपॅड आहे. फोन ड्युअल-बँड GSM 900/1800 नेटवर्कला सपोर्ट करतो. हँडसेटचे एक प्रमुख फिचर म्हणजे त्याची अपग्रेड केलेली 1450 mAh बॅटरी जी 34 तासांपर्यंत स्टँडबाय टाइम देते. 

नोकिया 130 म्युझिक पावरफुल लाउडस्पीकर आणि MP3 प्लेयरने सुसज्ज आहे. याद्वारे तुमचे म्युझिक आणि FM रेडिओ संचयित करण्यासाठी 32GB पर्यंत मायक्रो SD कार्डला सपोर्ट करते आणि त्यासाठी वायर्ड आणि वायरलेस दोन्ही मोड ऑफर करते.

Nokia 150 

आता नोकिया 150 बद्दल बोलायचे झाल्यास, ते आकर्षक डिझाइन आणि मजबूत बिल्टसह येते. यासोबतच फ्लॅशसह VGA रियर कॅमेरा देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये 2.4-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तुम्ही त्याचे लाऊड ​​स्पीकर आणि MP3 प्लेयर 30 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅकसाठी वापरू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo