Nokia 106 एका दमदार बॅटरी सह झाला लॉन्च, फीचर फोनची किंमत आहे Rs 1,299
Nokia 106 ची बॅटरी 15.7 तासांचा टॉक टाइम डिलीवर करते आणि 21 तासांचा स्टँड बाय टाइम ऑफर करते.
महत्वाचे मुद्दे
- Nokia 106 ची किंमत आहे Rs 1,299
- फोन मध्ये आहे Snake Xenzia गेम
- मोबाईल रिटेलर्स आणि नोकिया.कॉम वर उपलब्ध
आपला फीचर फोन पोर्टफोलियो वाढवत HMD ग्लोबल ने भारतात आपला Nokia 106 फोन लॉन्च केला आहे आणि या फोनची किंमत Rs 1,299 ठेवण्यात आली आहे. या फोनची बॅटरी 15.7 तासांचा टॉक टाइम आणि 21 तासांचा स्टँड बाय टाइम डिलीवर करते. Nokia 106 डार्क ग्रे कलर मध्ये उपलब्ध आहे आणि हा देशभरातील मोबाईल रिटेलर्स आणि नोकिया.कॉम वरून विकत घेतला जाऊ शकतो.
HMD ग्लोबल इंडिया चे वाईस प्रेसिडेंट आणि कंट्री हेड अजय मेहता म्हटले कि, “भारत एक महत्वपूर्ण फीचर फोन मार्केट आहे. इथल्या ग्राहकांना चांगली बॅटरी लाइफ, सोप्पा इंटरफेस आणि चांगली ड्यूरेबिलिटी हवी आहे आणि नोकिया सारखा ब्रँड त्यांना आवडतो. नोकिया फोन्स मध्ये हे गुण असतात आणि आम्ही आमच्या पोर्टफोलियो मध्ये हा नवीन फीचर फोन Nokia 106 सामील करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आशा करतो कि हा लाखो लोकांच्या गरजा पूर्ण करेल.”
Nokia 106 फीचर फोनला बार-डिजाइन देण्यात आली आहे आणि याला पोलीकार्बोनेट बॉडी देण्यात आली आहे. कंपनी म्हणते कि प्रत्येक बटणाच्या मध्ये चांगली जागा देण्यात आली आहे जेणेकरून टेक्स्टिंग किंवा डायलिंग करताना कोणतीही अडचण येऊ नये. फोन मध्ये Snake Xenzia गेम पण देण्यात आला आहे आणि फोनबुक मध्ये 2000 कॉन्टेक्ट्स स्टोर केले जाऊ शकतात. फोन मध्ये एक LED टॉर्च, इन-बिल्ट FM रेडियो पण देण्यात आला आहे आणि फोन मध्ये 500 मेसेजेस पण साठवले जाऊ शकतात.
ऑक्टोबर मध्ये HMD Global ने आपला Nokia 8110 4G फीचर फोन लॉन्च केला होता जो भारतात बनाना फोन नावाने ओळखला जातो. या फोन मध्ये गूगल असिस्टेंट, गूगल मॅप्स आणि गूगल सर्च सारखे ऍप्स आहेत. या फीचर फोन मध्ये फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया ऍप्स पण वापरले जाऊ शकतात जे ऍप स्टोर मधून डाउनलोड करावे लागतील. हा फोन KaiOS वर चालतो आणि भारतात याआधी लॉन्च झालेले जियोफोन आणि जियोफोन 2 पण या KaiOS वर चालतात.