HMD ग्लोबलने Nokia 105 Classic फीचर फोन भारतात लाँच केला आहे. या फिचर फोनला बेसिक लुक देण्यात आले आहे. या फीचर फोनमध्ये UPI ऍप देखील आहे, ज्याच्या मदतीने पेमेंट सहज करता येते. यापूर्वी स्मार्टफोन निर्मात्याने म्हणजेच Nokiaने या वर्षाच्या सुरुवातीला नोकिया 105 (2023) मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता नव्या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती बघुयात.
हे सुद्धा वाचा: Jio, Airtel, VI चे 84 दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लॅन्स, 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत भरपूर डेटासह Unlimited कॉलिंग
Nokia 105 Classic चार सिंगल आणि ड्युअल सिम व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत 999 रुपयांपासून सुरू होते. हा फोन चारकोल आणि ब्लू कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे डिव्हाइस अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते.
Nokia 105 हा क्लासिक 2G फीचर फोन आहे. हा फोन इन-बिल्ट UPI अप्लिकेशनसह येतो. याद्वारे तुम्ही सुरक्षित UPI पेमेंट करू शकता. नवीन फीचर 800mAh बॅटरीने सुसज्ज आहे. त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 2 दिवस टिकते. या फोनच्या कीपॅडच्या बटणांमध्ये बरीच स्पेस देण्यात आली आहे. याच्या मदतीने तुम्ही सहज टाईप देखील करू शकाल. त्याचबरोबर मनोरंजनासाठी फीचर फोनमध्ये FM रेडिओ सुद्धा उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात मायक्रोफोन, चार्जिंग पोर्ट आणि ऑडिओ जॅक आहे.
HMD ग्लोबलने नुकतीच एक नवीन स्कीम आणली होती. HMD EC Pay असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत फोन खरेदी करण्यासाठी 20% रक्कम भरावी लागणार आहे. यानंतर, तुम्ही EMI द्वारे उर्वरित पेमेंट करू शकता. यामुळे फोन खरेदी करणे ग्राहकांसाठी आणखी सोपे होईल, असा विश्वास देखील कंपनीने व्यक्त केला आहे.