Nokia 1 स्मार्टफोन रिलायंस जियो च्या Rs 2,200 वाल्या कॅशबॅक ऑफर सह झाला उपलब्ध

Nokia 1 स्मार्टफोन रिलायंस जियो च्या Rs 2,200 वाल्या कॅशबॅक ऑफर सह झाला उपलब्ध
HIGHLIGHTS

या ऑफर सह Nokia 1 स्मार्टफोन ला तुम्ही मुळ किंमती पेक्षा खुप कमी किंमतीत घेऊ शकता.

जसे की रिलायंस जियो ने सांगितले होते, यांनी आपल्या Rs 2,200 वाली कॅशबॅक ऑफर Nokia 1 स्मार्टफोन सह पण उपलब्ध करवून दिली आहे. Nokia 1 स्मार्टफोनला मागच्याच आठवड्यात भारतात एंड्राइड Oreo (Go Edition) सह लॉन्च करण्यात आले होते. 
याची मुळ किंमत पाहता हा Rs 5,499 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. पण आता याची प्रभावी किंमत Rs 3,299 आहे. याव्यतिरिक्त जियो ची ऑफर सोबत मिळाल्या मुळे तुम्हाला या स्मार्टफोन सह कॅशबॅक बरोबरच डेटा पण मिळत आहे. 
रिलायंस जियो ची Rs 2,200 वाली कॅशबॅक ऑफर
लोकांना आकर्षित करण्यासाठी रिलायंस जियो ने आपल्या लॉन्च च्या आधी पासुनच अनेक पद्धतींचा अवलंब केला आहे. आपला हाच उद्देश चालू ठेवत कम्पनी ने सर्व 4G स्मार्टफोंस साठी एका इंस्टेंट कॅशबॅक ऑफर ची घोषणा केली होती. या ऑफर ची वैधता 31 मार्च 2018 म्हणजे उद्या पर्यन्त वैध आहे. आपण अशी पण अपेक्षा करू शकतो की कंपनी या ऑफर ची मुदत वाढवेल कारण कंपनीने याआधी पण खुप सार्‍या ऑफर्स ची वैधता वाढवली आहे. 
आता आपण जाणून घेऊया तुम्ही कसा फायदा घ्याल या ऑफर चा: जर तुम्ही या ऑफर चा लाभ घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही आता एक 4G स्मार्टफोन विकत घेतला असेल. तर तुम्हाला तुमच्या या फोन मधील जियो सिम ला Rs 198 किंवा Rs 299 चा पहिला रीचार्ज करावा लागेल. असे करताच तुम्ही या ऑफर चा लाभ घेणार्‍या लोकांच्या लिस्ट मध्ये सामील व्हाल. त्या नंतर तुम्हाला Rs 50 च्या किंमतीचे 44 वाउचर मिळतील, जे तुम्हाला तुमच्या MyJioApp मध्ये मिळतील आणि याची एकूण किंमत Rs 2,200 होते. आता तुम्ही हे वाउचर्स तुम्ही आपल्या पुढच्या रिचार्ज मध्ये वापरू शकता. तसेच तुम्हाला या कॅशबॅक व्यतिरिक्त 60GB अतिरिक्त 4G डेटा दिला जात आहे. 
Nokia 1 स्मार्टफोन चे स्पेक्स
जर Nokia 1 स्मार्टफोन च्या एंड्राइड Go Edition बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 4.50-इंचाच्या डिस्प्ले सह येत आहे, जो 480×854 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो. स्मार्टफोन मध्ये एक क्वाड-कोर प्रोसेसर मिळत आहे, जो 1.1GHz च्या क्लॉक स्पीड सह येतो. तसेच स्मार्टफोन मध्ये 1GB ची रॅम सह 8GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. फोन मध्ये फोटोग्राफी साठी एक 5-मेगापिक्सल चा रियर आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. स्मार्टफोन एंड्राइड Oreo 8.1 Go Edition सह लॉन्च झाला आहे आणि यात 4G कनेक्टिविटी सह ड्यूल-सिम आणि एक वेगळा माइक्रोएसडी कार्ड आहे. स्मार्टफोन मध्ये एक 2150mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. 

हा स्मार्टफोन एंड्राइड Go च्या अनेक प्रीलोडेड अॅप्स सह लॉन्च करण्यात आले आहे, जसे स्मार्टफोन मध्ये Gmail, Google Assistant Go, Google Files Go, Google Maps Go, YouTube Go सारखे अॅप्स आधी पासून आहेत. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo