Nokia 1 साठी भारतात जारी झाला एप्रिल सिक्योरिटी अपडेट

Nokia 1 साठी भारतात जारी झाला एप्रिल सिक्योरिटी अपडेट
HIGHLIGHTS

Nokia 1 यावर्षीच्या सुरवातीला MWC 2018 मध्ये सादर करण्यात आले होते आणि भारतात हा डिवाइस काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला आहे.

HMD ग्लोबल आपला वादा पूर्ण करत आपल्या Nokia ब्रांडेड स्मार्टफोंस साठी वेळेवर सॉफ्टवेयर अपडेट जारी करत आहे. लेटेस्ट स्मार्टफोन Nokia 1 साठी नवीन अपडेट जारी करण्यात आला आहे. एंट्री-लेवल Nokia 1 स्मार्टफोन ला एप्रिल सिक्योरिटी अपडेट मिळणे सुरू झाले आहे. या अपडेट ची साइज जवळपास 142MB आहे आणि हा पूर्ण सिस्टम स्टेबिलिटी वर फोकस करतो. रिपोर्ट नुसार भारत आणि इराक मध्ये Nokia 1 साठी हा अपडेट जारी करण्यात आला आहे. 

Nokia 1 यावर्षीच्या सुरवातीला MWC 2018 मध्ये सादर करण्यात आले होते आणि भारतात हा डिवाइस काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला आहे. हा एंड्राइड गो एडिशन स्मार्टफोंस मधील एक आहे आणि याची किंमत  5,499 रूपये आहे. एंड्राइड ओरियो (गो एडिशन) वर चालणार हा स्मार्टफोन जास्तीत जास्त गूगल अॅप्स चे हलक्या वर्जन साठी उपयुक्त आहे. एंड्राइड OS चे हे वर्जन एंट्री-लेवल स्मार्टफोंस वर यूजर्सना चांगला एक्सपीरियंस देतो. 
हा स्मार्टफोन 4.50-इंचाच्या डिस्प्ले सह येतो, ज्याचे 480×854 पिक्सल रेजोल्यूशन आहे. स्मार्टफोन मध्ये एक क्वाड-कोर प्रोसेसर मिळत आहे, जो 1.1GHz च्या क्लॉक स्पीड सह येतो त्याचबरोबर स्मार्टफोन मध्ये 1GB च्या रॅम सह 8GB इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. फोन मध्ये फोटोग्राफी साठी एक 5-मेगापिक्सल चा रियर आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. हा स्मार्टफोन 4G कनेक्टिविटी सह ड्यूल-सिम आणि एका वेगळ्या माइक्रोएसडी कार्ड सह येतो. स्मार्टफोन मध्ये एक 2150mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. 
या स्मार्टफोन ला एंड्राइड Go च्या काही प्रीलोडेड अॅप्स सह लॉन्च करण्यात आले आहे. यात Gmail, Google Assistant Go, Google Files Go, Google Maps Go, YouTube Go सारख्या अॅप्स चा समावेश आहे. हा डिवाइस भारतात रेड आणि डार्क ब्लू रंगात लॉन्च करण्यात आला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo