Nokia 1 एंड्राइड Go Edition सह भारतासाठी झाला लॉन्च, जाणून घ्या याच्या किंमती बद्दल

Updated on 27-Mar-2018
HIGHLIGHTS

Nokia 1 भारतीय बाजारात एंड्राइड Oreo (Go Edition) आणि 4G कनेक्टिविटी सह अधिकृत पणे लॉन्च करण्यात आले आहे. Nokia 1 स्मार्टफोन ची भारतातील किंमत Rs 5,499 आहे.

Nokia 1, एक बजेट स्मार्टफोन आहे आणि आता याला भारतात Android Oreo (Go Edition) सोबत 4G कनेक्टिविटी सह लॉन्च करण्यात आले आहे. या स्मार्टफोन ची भारतातील किंमत Rs 5,499 असणार आहे. हा स्मार्टफोन एक बजेट स्मार्टफोन आहे आणि हा तुम्ही सर्व मोठ्या मोबाईल फोन आउटलेट्स मधून 28 मार्च, 2018 पासून विकत घेऊ शकता. Nokia 1 स्मार्टफोन च्या या नव्या एडिशन ला सर्वात आधी MWC 2018 दरम्यान बार्सिलोनात फेब्रुवारी मध्ये लॉन्च करण्यात आले होते. 

Nokia 1 स्मार्टफोन भारतात रेड आणि डार्क ब्लू रंगात लॉन्च करण्यात आले आहे आणि याची किंमत Rs 5,499 आहे. याव्यतिरिक्त HMD ग्लोबल ने या स्मार्टफोन सोबत Xpress On Covers पण लॉन्च केले आहेत. हे एप्रिल 2018 पासून Rs 450 प्रति कवर किंमती सह उपलब्ध होणार आहेत. तसेच Nokia 1 स्मार्टफोन सोबत तुम्हाला जियो कडून Rs 2,200 चा कॅशबॅक पण मिळत आहे. ज्या नंतर या स्मार्टफोन ची प्रभावी किंमत फक्त Rs 3,299 होते. याव्यतिरिक्त Nokia 1 लॉन्च डील अंतर्गत तुम्हाला 60GB चा अॅडिशनल डेटा पण मिळत आहे. 

त्याच बरोबर या स्मार्टफोन सोबत तुम्हाला 12 महिन्यांचा अॅक्सीडेंटल डॅमेज इंश्यूरेंस Servify कडून मिळत आहे. पण त्यासाठी यूजर्सना एक Kotak 811 चे बचत खाते उघडावे लागेल, जे जवळपास Rs 1,000 देऊन उघडावे लागेल. त्यानंतरच हा अॅक्सीडेंटल डॅमेज इंश्यूरेंस एक्टिवेट होईल. तसेच या स्मार्टफोन सोबत तुम्हाला अजून एक ऑफर मिळत आहे. जर तुम्ही RedBus च्या माध्यमातून तुमची पहिली राइड बुक केली तर तुम्हाला 20 टक्के ऑफ पण मिळणार आहे. 
Nokia 1 स्मार्टफोन च्या एंड्राइड Go Edition बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 4.50-इंचाच्या डिस्प्ले सह येतो, ज्याचा 480×854 पिक्सल रेजोल्यूशन आहे. स्मार्टफोन मध्ये एक क्वाड-कोर प्रोसेसर मिळत आहे, जो 1.1GHz च्या क्लॉक स्पीड सह येतो. याव्यतिरिक्त या स्मार्टफोन मध्ये 1GB च्या रॅम सह 8GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. फोन मध्ये फोटोग्राफी साठी एक 5-मेगापिक्सल चा रियर आणि 2-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. स्मार्टफोन एंड्राइड Oreo 8.1 Go Edition सह लॉन्च झाला आहे आणि हा 4G कनेक्टिविटी सह ड्यूल-सिम आणि एका वेगळ्या माइक्रोएसडी कार्ड सह येतो. स्मार्टफोन मध्ये एक 2150mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. 

या स्मार्टफोन ला एंड्राइड Go च्या काही प्रीलोडेड अॅप्स सह लॉन्च करण्यात आले आहे. यात Gmail, Google Assistant Go, Google Files Go, Google Maps Go, YouTube Go सारख्या अॅप्स चा समावेश आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :