गुगलने अलीकडेच आपले दोन नवीन स्मार्टफोन्स नेक्सस 6P आणि नेक्सस 5X ला बाजारात आणले आहे. आणि आता अशी माहिती मिळत आहे की, ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट नेक्सस 6P स्मार्टफोनला उत्कृष्ट एक्सचेंज ऑफरसह देत आहेत. खरे पाहता, फ्लिपकार्ट ह्या स्मार्टफोनवर २५ हजारांचा डिस्काउंट देत आहे. जर आपण एक्सीस बँक कार्ड यूजर असाल, तर आपल्याला ह्यावर १० टक्के (जवळपास २,००० रुपये)चा अजून जास्त डिस्काउंट मिळेल.
ह्या ऑफर्ससह यूजर्स नेक्सस 6P स्मार्टफोनला १२,९९९ रुपयाच्या किंमतीत खरेदी करु शकतात. यूजर्सला २५ हजारांची एक्सचेंज ऑफर आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लसवर, तर मोटोरोला नेक्सस 6 आणि एलजी नेक्सस 5 वर २० हजारांचा डिस्काउंट मिळेल. ह्या एक्सचेंज ऑफरच्या बदल्यात आपण नेक्सस 6P चा 32GB चा प्रकार खरेदी करु शकतात.
हुआवे नेक्सस 6Pच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे आणि ह्यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4 चे प्रोटेक्शन दिले गेले आहे. हा स्मार्टफोन 2GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर आहे आणि हा 3GB रॅमने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अॅपर्चर असलेला 12.3 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे, ज्याला 4K रिझोल्युशन आहे आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा पहिला पुर्ण मेटल स्मार्टफोन आहे, जो अॅल्युमिनियमने बनला आहे.
त्याशिवाय हुआवे नेक्सस 6P स्मार्टफोनमध्ये 3450mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्यात क्विक चार्ज फीचरसाठी सपोर्ट उपलब्ध आहे. ह्या फीचरच्या माध्यमातून केवळ १० मिनिटाच्या चार्जने ७ तासांपर्यंत बॅटरी चालेल. हँडसेट फॉर्स्ट व्हाइट, अॅल्युमिनियम आणि ग्रेफाइट रंगात उपलब्ध होतील.