नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनला अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोचे अपडेट मिळणे सुरु
Nextbit Robin जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो “Cloud Phone” ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला आता अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोचे अपडेट मिळणे सुरु झाले आहे.
Nextbit Robin जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो “Cloud Phone” ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनला आता अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोचे अपडेट मिळणे सुरु झाले आहे.
जगातील पहिला “क्लाउड फर्स्ट” अॅनड्रॉईड स्मार्टफोन नेक्स्टबिट रॉबिन लवकरच भारतात आपले पाऊल टाकणार आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ४०० डॉलर म्हणजेच २८,००० रुपये असू शकते. अमेरिकेत ह्या स्मार्टफोनची किंमत इतकीच आहे. त्याशिवाय भारतात ह्याच्या किंमतीविषयी अजून काही माहिती दिलेली नाही. ह्या कंपनीचे निर्मिती त्या दोन व्यक्तींनी केली आहे, जे ह्याआधी गुगल अॅनड्रॉईड टीमवर काम करत होते, म्हणजेच Tim Moss आणि Mike Chan.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाची पुर्ण HD १०८०x१९२० पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. ज्यात एक फंकी प्लॅस्टिक बॉडी लावली आहे. स्मार्टफोन आपल्याला मिंट आणि मिडनाइट अशा दोन रंगात अगदी सहज मिळेल. नेक्स्टबिटचा हा रॉबिन स्मार्टफोन क्वाल-कॉम हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसरसह येतो आणि ह्यात ३जीबीची रॅमसुद्धा दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबीचे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. ह्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकत नाही, कारण ह्यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट नाही. ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात वापरण्यात आलेले क्लाउड स्टोरेज. त्यामुळे तुमचे जास्तीचे स्टोरेज तुम्ही क्लाउड स्टोरेजमध्ये ठेवू शकता आणि कधीही आपल्या फोनसाठी वापरु शकता. मात्र हे क्लाउड भारतीय यूजर्ससाठी एक समस्या असू शकते. कारण त्यांना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी कदाचित मिळणार नाही. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळत आहे.
हेदेखील वाचा – आकर्षक डिझाईन्समुळे हे स्मार्टफोन्स आहेत स्वत:तच काही खास!
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसरसह 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळेल.
हेदेखील वाचा – 4 GB DDR3 ने सुसज्ज आहेत HP आणि Dell चे हे नोटबुक
हेदेखील वाचा – आता व्हॉट्सअॅप होणार अजून अॅडव्हान्स, सामील आणखी नवीन फीचर
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile