१६ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोन

१६ फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोन
HIGHLIGHTS

सध्यातरी ह्या स्मार्टफोनचा GSM व्हर्जन दिला गेला आहे. CDMA व्हर्जन ह्या वर्षाच्या शेवटी उपलब्ध केला जाईल. ह्या हँडसेटची प्री-ऑर्डर बुकिंग 15 जानेवारीपर्यंत केली जाऊ शकते.

मोबाईल निर्माता कंपनी नेक्स्टबिटने अलीकडेच आपला स्मार्टफोन रॉबिन सादर केला होता. कंपनीने ह्या स्मार्टफोनला किकस्टार्टर कॅम्पेनच्या माध्यमातून सेल करण्याची योजना बनवली होती. आता बातमी मिळत आहे की, ह्या १६ फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन उपलब्ध केला जाईल. सर्वात आधी हा स्मार्टफोन त्या लोकांना मिळेल,ज्यांनी सर्वात आधी ह्या किकस्टार्टर कंपनीच्या प्रोजेक्टचे समर्थन केले होते. इतर समर्थकांना फेब्रुवारीच्या शेवटी हा स्मार्टफोन उपलब्ध केला जाईल.

 

नेक्सबिटचे मुख्य डिझाइनर स्कॉट क्रॉएलने CES 2016 मध्ये ह्यासंबंधी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सध्यातरी ह्या स्मार्टफोनचा GSM व्हर्जन दिला गेला आहे. CDMA व्हर्जन ह्या वर्षाच्या शेवटी उपलब्ध केला जाईल. ह्या हँडसेटची प्री-ऑर्डर बुकिंग 15 जानेवारीपर्यंत केली जाऊ शकते. क्लाउड स्टोरेजसह येणा-या ह्या स्मार्टफोनची बुकिंग मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरु झाली होती.

रॉबिनला कंपनीने सर्वसामान्य यूजरच्या मर्यादित स्टोरेजमुळे होणा-या समस्येला लक्षात ठेवून बनविण्यात आले आहे. नेक्स्टबिट क्लाउड स्टोरेजच्या माध्यमातून ह्या समस्येचे निराकरण होईल. ह्या स्मार्टफोनची किंमत 399 डॉलर (जवळपास २६,००० रुपये) पासून सुरु होईल आणि ह्याला भारतात मागविण्यासाठी अतिरिक्त 70 डॉलर (जवळपास ४,६०० रुपये द्यावे लागतील.)

तसेच ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे कंपनी सर्व रॉबिन यूजर्सला १००जीबीचा खाजगी स्टोरेज बॉक्स देईल. जेव्हा रॉबिन स्मार्टफोन चार्जर आणि वायफाय नेटवर्क कनेक्ट होतील, तेव्हा तो डिवाइस आपल्या लोकल डेटाला क्लाउडवर स्टोर करेल. ह्यामुळे स्मार्टफोनच्या लोकल स्टोरेजमध्ये वाढ होईल.

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाची पुर्ण HD १०८०x१९२० पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. ज्यात एक फंकी प्लॅस्टिक बॉडी लावली आहे. स्मार्टफोन आपल्याला मिंट आणि मिडनाइट अशा दोन रंगात अगदी सहज मिळेल. नेक्स्टबिटचा हा रॉबिन स्मार्टफोन क्वाल-कॉम हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसरसह येतो आणि ह्यात ३जीबीची रॅमसुद्धा दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबीचे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. ह्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकत नाही, कारण ह्यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट नाही. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळत आहे.

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये USB Type-C चार्जिंग पोर्टसुद्धा दिला गेला आहे. स्मार्टफोन सिंगल सिमसोबत येतो. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला २६८०mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे. ह्याच्या कनेक्टिव्हिटी पर्यायाबाबत बोलायचे झाले तर ह्यात LTE सपोर्टसोबत, 3G, वायफाय आणि इतर सर्व पर्याय समाविष्ट आहेत.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo