नेक्स्टबिटने भारतात आपल्या रॉबिन स्मार्टफोनला लाँच करण्याची सर्व तयारी केली आहे. त्याचबरोबर कंपनीने ह्याच्या लाँचसाठी मिडिया इनवाइट पाठवणे सुरु केले आहे.
नेक्स्टबिटने भारतात आपल्या रॉबिन स्मार्टफोनला लाँच करण्याची सर्व तयारी केली आहे. त्याचबरोबर कंपनीने ह्याच्या लाँचसाठी मिडिया इनवाइट पाठवणे सुरु केले आहे. त्यानुसार, ह्या स्मार्टफोनला २५ मे ला लाँच केले जाईल. देशात लाँच होणारा हा पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यात 100GB चे क्लाउड स्टोरेज मिळत आहे.
त्याशिवाय काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या बातमीनुसार, ह्या स्मार्टफोनला अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोचे अपडेट मिळणे सुरु झाले आहे, मात्र आता पाहायचे हे आहे की, ह्याला भारतातसुद्धा ह्याच अपडेटसह लाँच करतील की नाही.
ह्या स्मार्टफोनचे काही स्पेक्स समोर आले होते, जसे की ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची डिस्प्ले आणि 3GB ची रॅम असणार आहे. ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट ही आहे की, ह्यात क्लाउड स्टोरेजचा वापर केला गेला आहे आणि कोणत्याही वेळी आपण आपल्या फोनमध्ये हे वापरु शकता. मात्र हा क्लाउड भारतीय यूजर्ससाठी समस्येचे कारण बनू शकतो. कारण त्यांना ह्यात कदाचित चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार नाही.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसरसह 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळणार आहे.