जगातील पहिला क्लाउड स्टोरेज स्मार्टफोन अखेर लाँच, किंमत १९,९९९ रुपये
हा एक क्लाउड-बेस्ड अॅनड्रॉईड स्मार्टफोन आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सोमवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
नेक्स्टबिटने भारतीय बाजारात आपला नवीन फोन नेक्स्टबिट रॉबिन लाँच केला. भारतीय बाजाराता ह्या फोनची किंमत १९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सोमवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा एक क्लाउड-बेस्ड अॅनड्रॉईड स्मार्टफोन आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD 1080×1920 पिक्सेल डिस्प्ले दिली गेली आहे. ज्यात एक फंकी प्लॅस्टिक बॉडी लावण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला मिंट आणि मिडनाइट अशा दोन रंगात अगदी सहजपणे उपलब्ध होईल. फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये USB Type-C चार्जिंग पोर्टसुद्धा दिले आहे. हा स्मार्टफोन सिंगल सिमसह उपलब्ध केला आहे.
हेदेखील पाहा – हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात LTE सपोर्टसह 3G, वायफाय आणि इतर पर्याय दिले आहेत. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईडवर चालतो. मात्र ह्याच्या व्हर्जनविषयी अजून काही निश्चित सांगण्यात आलेले नाही. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2680mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा – Sennheiser ने लाँच केले HD400 सीरिजचे नवीन हेडफोन्स, किंमत ५००० रुपयांपासून सुरु
हेदेखील वाचा -आसूस झेनफोन मॅक्स स्मार्टफोनच्या किंमतीत झाली खूप मोठी घट