नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनची बुकिंग सुरु

नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनची बुकिंग सुरु
HIGHLIGHTS

रॉबिन-को कंपनीने सामान्य यूजरला मर्यादित स्टोरेजमुळे होणा-या समस्येला समोर ठेवूनच हा स्मार्टफोन बनवला आहे. नेक्स्टबिट क्लाउड स्टोरेजच्या माध्यमातून ह्या समस्येचे निराकरण होईल. नेक्स्टबिटचा रॉबिन हा एक असा स्मार्टफोन आहे जो, आपल्या स्टोरेजच्या समस्येला अगदी मूळापासून नष्ट करतो. कंपनी ह्या स्मार्टफोनच्या युजर्ससाठी १०० जीबीचा बॉक्ससुद्धा देत आहे.

भारतासह अन्य देशातही नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोनची प्री-ऑर्डर बुकिंग सुरु झाली आहे. ह्याला किकस्टार्टर कॅम्पेनच्या माध्यमातून विकले जात आहे. रॉबिन-को कंपनीने सामान्य यूजरला मर्यादित स्टोरेजमुळे होणा-या समस्येला समोर ठेवूनच हा स्मार्टफोन बनवला आहे. नेक्सबिट क्लाउड स्टोरेजच्या माध्यमातून ह्या समस्येचे निराकरण होईल.ह्या स्मार्टफोनची किंमत ३९९ डॉलर (जवळपास २६,००० रुपये) ने सुरु होईल आणि हा भारतात मागवण्यासाठी अतिरिक्त ७० डॉलर (जवळपास ४,६०० रुपये) द्यावे लागतील.

 

ह्या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे कंपनी सर्व रॉबिन यूजरला १०० जीबीचा खाजगी स्टोरेज बॉक्ससुद्धा देईल. जेव्हा रॉबिन स्मार्टफोन चार्जर आणि वायफाय नेटवर्कशी कनेक्टेड असेल तेव्हा डिव्हाईस आपल्या लोकल डेटाला क्लाउडवर स्टोर करेल. अशा प्रकारे स्मार्टफोनचे लोकल स्टोरेजसुद्धा वाढेल.

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाची पुर्ण HD १०८०x१९२० पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. ज्यात एक फंकी प्लॅस्टिक बॉडी लावली आहे. स्मार्टफोन आपल्याला मिंट आणि मिडनाइट अशा दोन रंगात अगदी सहज मिळेल. नेक्स्टबिटचा हा रॉबिन स्मार्टफोन क्वाल-कॉम हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसरसह येतो आणि ह्यात ३जीबीची रॅमसुद्धा दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ३२ जीबीचे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. ह्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकत नाही, कारण ह्यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट नाही. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळत आहे.

 

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये USB Type-C चार्जिंग पोर्टसुद्धा दिला गेला आहे. स्मार्टफोन सिंगल सिमसोबत येतो. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला २६८०mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे. ह्याच्या कनेक्टिव्हिटी पर्यायाबाबत बोलायचे झाले तर ह्यात LTE सपोर्टसोबत, 3G, वायफाय आणि इतर सर्व पर्याय समाविष्ट आहेत.

नेक्स्टबिट रॉबिन को कंपनी किकस्टार्टर प्रोग्रामच्या अंतर्गत सादर केले होते. ह्यासाठी कंपनीने ५००,००० डॉलर(जवळपास ३.२६ करोड रुपये) चे फंडिंग लक्ष्य ठेवले होते, ज्याला बाजारात जबरदस्त समर्थन मिळाले. आणि कंपनीला  १,३६२,३४४ डॉलर(जवळपास ८.९ करोड रुपये) इतकी फंडिंग मिळाली.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo