नेक्स्टबिटने आपल्या नवीन स्मार्टफोन रॉबिनला एक नवीन अपडेट दिले आहे. ह्या नवीन अपडेटच्या माध्यमातून ह्या फोनला जून महिन्याचा सिक्यूरिटी अपडेट मिळेल, ह्या नवीन अपडेटनुसार, ह्या फोनचे प्रदर्शन अजून चांगले होईल. ह्यामुळे फोनच्या स्पीकरच्या आवाजाचा दर्जा अजून चांगला होईल. ह्या नवीन अपडेटच्या माध्यमातून ह्या फोनचा कॅमेरासुद्धा अजून चांगला होईल.
नेक्स्टबिटने भारतीय बाजारात आपला नवीन फोन नेक्स्टबिट रॉबिन लाँच केला. भारतीय बाजाराता ह्या फोनची किंमत १९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सोमवारपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा एक क्लाउड-बेस्ड अॅनड्रॉईड स्मार्टफोन आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची पुर्ण HD 1080×1920 पिक्सेल डिस्प्ले दिली गेली आहे. ज्यात एक फंकी प्लॅस्टिक बॉडी लावण्यात आली आहे. हा स्मार्टफोन आपल्याला मिंट आणि मिडनाइट अशा दोन रंगात अगदी सहजपणे उपलब्ध होईल. फोटोग्राफीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये USB Type-C चार्जिंग पोर्टसुद्धा दिले आहे. हा स्मार्टफोन सिंगल सिमसह उपलब्ध केला आहे.
हेदेखील पाहा – हे आहेत भारतातील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचेस
हा स्मार्टफोन क्वालकॉम हेक्सा-कोर स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसरसह येतो. ह्यात 3GB ची रॅम देण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. ह्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकत नाही. ह्यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा मिळत आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात LTE सपोर्टसह 3G, वायफाय आणि इतर पर्याय दिले आहेत. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईडवर चालतो. मात्र ह्याच्या व्हर्जनविषयी अजून काही निश्चित सांगण्यात आलेले नाही. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला 2680mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा – LeMall ह्या शॉपिंग पोर्टलवर केवळ १ रुपयात मिळतोय LeEco Le 2 स्मार्टफोन
हेदेखील वाचा – २०१७ च्या सुरुवातीला सॅमसंग लाँच करु शकतो आपला बेंडेबल स्क्रीन असलेले स्मार्टफोन्स:ब्लूमबर्ग