भारतात मे महिन्यात येईल Nextbit Robin चा ‘Cloud first’ स्मार्टफोन

भारतात मे महिन्यात येईल Nextbit Robin चा ‘Cloud first’ स्मार्टफोन
HIGHLIGHTS

ही कंपनी भारतामध्ये जास्तीत जास्त यूजर्सला आपल्याकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे. तरीही हे काम म्हणावे तितके सोपे नाही.

जगातील पहिला “क्लाउड फर्स्ट” अॅनड्रॉईड स्मार्टफोन, नेक्स्टबिट रॉबिन लवकरच भारतात आपले दमदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अशी घोषणा केली आहे की, ती मे २०१६ मध्ये भारतात पाऊल टाकणार आहे. ह्या फोनची किंमत ४०० डॉलर म्हणजेच २८,००० रुपये असू शकते. यूएसमध्ये ह्या स्मार्टफोनची किंमत एवढीच आहे. त्याशिवाय भारतात ह्याच्या किंमतीविषयी कोणतीही अधिकृत माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही. ह्या कंपनीची निर्मिती अशा दोन मातब्बर व्यक्तींनी केली आहे, ज्यांनी ह्या कंपनीची सुरुवात करण्याआधी पहिले गुगलची अॅनड्रॉईड टीम म्हणून काम करत होते. हे दोन तज्ज्ञ आहेत Tim Moss आणि Mike Chan.

 

ह्या स्मार्टफोनचे काही स्पेक्स समोर आले आहेत, जसे की ह्या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची डिस्प्ले आणि 3GB ची रॅम असणार आहे आणि ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात क्लाउड स्टोरेजचा वापर केला गेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला ह्या स्मार्टफोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत असेल, तरी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या डाटाला क्लाउड स्टोरेजमध्ये ठेवू शकाल आणि हवे तेव्हा आपल्या फोनमध्ये वापरु शकाल. कारण त्यांनी उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी कदाचित मिळू शकणार नाही.

 

त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसरसह 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळणार आहे.

 

हेदेखील वाचा – बहुप्रतिक्षित असा HTC 10 स्मार्टफोन झाला अखेर लाँच

हेदेखील वाचा – शेतीविषयक इत्यंभूत माहिती देतील हे अॅप्स आणि ते ही मराठीतून!

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo