Realme C1 मोबाईल फोनचा नवा वेरिएंट लवकरच भारतात होईल लॉन्च
Realme आता लवकरच भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनी ने हा मोबाईल फोन Flipkart च्या माध्यमातून टीज पण केला आहे. चला बघूया कि या मोबाईल फोन मध्ये काय काय असणार आहे.
भारतात लवकरच Realme C1 मोबाईल फोनचा नवा वेरिएंट लॉन्च करू शकते. कंपनी ने या आगामी मोबाईल फोनला म्हणजे Realme च्या या नवीन मोबाईल फोनला Flipkart च्या माध्यमातून टीज केले आहे. त्याचबरोबर असे समोर येत आहे कि हा मोबाईल फोन मनोरंजनावर आधारित असणार आहे.
असे अनेक लीक आणि रुमर्स समोर आले आहेत कि हा मोबाईल फोन Realme A1 या नावाने लॉन्च केला जाऊ शकतो, सोबत इतर अनेक लीक असे पण म्हणत आहेत कि हा मोबाईल फोन Realme 3 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. हा मोबाईल फोन आता भारतात लवकरच लॉन्च केला जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
Realme C1 मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर Realme C1 मध्ये 6.2 इंचाचा HD+ नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे जो याला नवीन फीचर सह सर्वात किफायती स्मार्टफोन बनवतो. मोबाईल फोनला यूनीबॉडी डिजाइन आणि ग्लोसी बॅक पॅनल देण्यात आली आहे. Realme C1 कंपनीच्या कलर OS 5.1 UI सह एंड्राइड 8.1 ओरियो वर चालतो. Realme C1 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 SoC, 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज ने सुसज्ज आहे आणि याची स्टोरेज माइक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते.
रियलमीच्या नवीन मोबाईल फोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचे तर यांच्या मागे 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे तसेच डिवाइसच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जो सेल्फी आणि विडियो कॉलच्या उपयोगी पडतो. कनेक्टिविटी ऑप्शन मध्ये 4G VoLTE, 3.5mm ऑडियो पोर्टचा समावेश आहे आणि हा 4,230mAh च्या बॅटरी सह येतो.