बजेट स्मार्टफोनसाठी प्रसिद्ध असलेली स्मार्टफोन निर्माता TECNO भारतीय बाजारपेठेत एक नवीन आणि स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्यास सज्ज झाली आहे. होय, कंपनी आपला नवा फोन ‘TECNO POP 9 5G’ नावाने लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन बबजेट विभागात लाँच केला जाईल, अशी माहिती मिळाली आहे. हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येऊ शकतो. ब्रँडने आपली मायक्रोसाइट ऑनलाइन शॉपिंग साइट Amazon वर लाइव्ह देखील केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Tecno Pop 9 5G बद्दल सविस्तर तपशील-
Also Read: बहुप्रतीक्षित OnePlus 13 लवकरच होणार भारतात दाखल! फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वी Leak
TECNO ने अधिकृतपणे घोषित केले आहे की, Tecno Pop 9 5G पुढील आठवड्यात 24 सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. प्रसिद्ध शॉपिंग साईट Amazon मायक्रोसाइटनुसार, हे उपकरण 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, हा फोन विशेषतः तरुण ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आले आहे.
कारण यात उत्कृष्ट कार्यक्षमता, उच्च गती आणि अनेक पॉवरफुल फीचर्स आहेत. TECNO POP 9 5G च्या मागील पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि रिंग LED लाईट दिसत आहेत. याशिवाय उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे आहेत. डिव्हाइससोबत दोन स्किन देखील दिले जातील. यामुळे फोनचा बॅक पॅनल युनिक दिसेल, याची पुष्टी मायक्रोसाईटद्वारे करण्यात आली आहे.
Amazon मायक्रोसाईटनुसार, Tecno Pop 9 5G मध्ये HD Plus रिझोल्यूशनसह 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले पॅनेल मिळेल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट ऑफर केला जाईल. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 4GB RAM + 4GB व्हर्च्युअल रॅम द्वारे फोन सुसज्ज असेल. त्याबरोबरच, या फोनमध्ये 64GB आणि 128GB अंतर्गत स्टोरेज ऑप्शन्स उपलब्ध असतील.
कॅमेरा सेक्शनमध्ये TECNO POP 9 5G स्मार्टफोनमध्ये 48MP चा Sony IMX582 AI प्राथमिक सेन्सर असेल. या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच हे ऑफर केले जात आहे, असा कंपनीचा दावा आहे. फोनमधील इतर फीचर्सबद्दल बोलायचे असेल तर, या फोनमध्ये IP54 रेटिंग, स्टिरिओ स्पीकर, डॉल्बी ॲटमॉस, ड्युअल सिम 5G, Wi-Fi यांसारखी अनेक फीचर्स आहेत. याशिवाय, फोनसोबत 4 वर्षांचा लॅग-फ्री परफॉर्मन्स ऑफर केला जाईल, हे देखील मायक्रोसाइटमध्ये सांगण्यात आले आहे.