Tecno चे नवे फोल्डेबल स्मार्टफोन Amazon वर सूचिबद्ध! लवकरच होणार भारतात लाँच, पहा डिटेल्स

Updated on 06-Dec-2024
HIGHLIGHTS

TECNO ने Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 या वर्षी सप्टेंबरमध्ये जागतिक स्तरावर लाँच केले.

TECNO चे आगामी Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 लवकरच भारतात लाँच होणार

दोन्ही फोन्स Amazon वर Coming Soon या टॅगलाइनसह टीज केले जात आहेत.

अलीकडेच प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता TECNO ने Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 या वर्षी सप्टेंबरमध्ये जागतिक स्तरावर लाँच केले. आता Tecno चे हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, दोन्ही आगामी स्मार्टफोन्स ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. मात्र, दोन्ही हँडसेटच्या लाँचची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण याबाबत महत्त्वाचे तपशील पुढे आले आहेत.

Also Read: अगदी निम्म्या किमतीत खरेदी करा Infinix चा लोकप्रिय फोल्डेबल स्मार्टफोन, Flipkart सेलअंतर्गत भारी Discount

TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 चे भारतीय लॉन्चिंग

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता TECNO चे आगामी Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 लवकरच भारतात लाँच होणार आहेत. हे दोन्ही फोन्स Amazon वर Coming Soon या टॅगलाइनसह टीज केले जात आहेत. यावरून समजते की, हे दोन्ही स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहेत.

फोनबद्दल अनेक लीक्स देखील पुढे आले आहेत. सध्या, TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 च्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु, V Flip 2 ची सुरुवातीची किंमत 35 ते 40 हजार रुपयांच्या दरम्यान असेल आणि V Fold 2 ची किंमत 50 ते 55 हजार रुपयांदरम्यान असेल, असा दावा लीकमध्ये केला जात आहे. या आगामी फोन्समुळे मोटोरोला आणि इन्फिनिक्स सारख्या ब्रँडना बाजारात जोरदार स्पर्धा मिळेल.

TECNO Phantom V Fold 2 आणि V Flip 2 चे तपशील

आगामी Tecno Phantom V Fold 2 आणि V Flip 2 चे फीचर्स देखील मायक्रो साइटवरून समोर आले आहेत. V Fold 2 मध्ये AI फीचर्सही देण्यात येणार आहेत. फोनमध्ये 24GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज प्रदान केले जाईल. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP मुख्य लेन्स, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP पोर्ट्रेट लेन्स आहेत. सेल्फीसाठी 32MP कॅमेरा उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, यात 70W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी 5750mAh बॅटरी देखील उपलब्ध असेल.

Tecno V Flip 2 फोनमध्ये स्क्रीन प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास 8 प्रोटेक्शन ग्लास बसवण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन AI फीचर्स आणि 256GB स्टोरेजसह सुसज्ज आहे. याशिवाय, फोटोग्राफीसाठी या डिव्हाइसमध्ये 50MP मुख्य आणि 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स असतील. सेल्फीसाठी 32MP कॅमेरा देखील उपलब्ध असेल. पॉवर बॅकअपसाठी, यात 70W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 4720mAh बॅटरी असेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :