मागच्या काही काळात जवळपास सर्वच स्मार्टफोन निर्माता आपल्या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये वॉटरप्रुफिंग फीचर आणत आहेत. पण हा मोठा फीचर आता पर्यंत OnePlus च्या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये उपलब्ध नव्हता. OnePlus च्या आत्ताच आलेल्या टीजर नुसार आगामी OnePlus 6 वॉटरप्रुफ डिवाइस असेल.
Samsung आणि Sony च्या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये नेहमी हा फीचर असतो. पण या डिवाइस ची किंमत पण जास्त असते ज्यामुळे हे परवडत नाहीत. पण आशा आहे की OnePlus 6 परवडणाऱ्या किंमतीत ग्राहकांसाठी वॉटरप्रुफ फ्लॅगशिप डिवाइस घेऊन येईल.
पण टीजर मध्ये हँडसेट च्या IP रेटिंग बद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे हे नक्की कळले नाही की हा डिवाइस P20 प्रमाणे IP57 रेटिंग सह येईल की Galaxy S9 प्रमाणे IP68 रेटिंग सह.
तसेच या डिवाइस बद्दल आलेल्या आधीच्या लीक्स आणि रुमर्स बद्दल बोलायचे झाले तर यात एक 20-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सल चा कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. होने के भी आसार हैं। इस लीक पोस्टर वरून हे पण समोर येत आहे की डिवाइस मध्ये 6GB/8GB रॅम सह 256GB ची इंटरनल स्टोरेज असू शकते. त्याचबरोबर या लीक वरून यात नॉच असण्याची शक्यता दिसत आहे. अशीच माहिती याआधी आलेल्या लीक्स मधुन पण समोर आले आहे. तसेच असेही समजले आहे की डिवाइस मध्ये एक 6.28-इंचाचा एक AMOLED डिस्प्ले असणार आहे, जो 2280×1080 पिक्सल सह येईल.
काही इतर रिपोर्ट पाहिले तर हा डिवाइस Rs 33,999 च्या सुरवाती किंमतीत भारतात सादर केला जाऊ शकतो, तसेच याची किंमत Rs 48,999 पर्यंत जाऊ शकते. हा फ्लॅगशिप डिवाइस लॉन्च होण्याआधीच याबद्दल अनेक लीक्स समोर आलेले आहेत ज्यात याच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती मिळाली आहे. इतक्या लीक्स नंतर लवकरच हा फोन लॉन्च होईल.