नुकत्याच रिलीज झालेल्या एका नवीन टीजरमध्ये असे सांगण्यात आले आहे की, विवो X7 स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, हेलिओ X25 प्रोसेसर आणि 6GB रॅम असेल.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी विवो लवकरच आपला नवीन स्मार्टफोन विवो X7 लाँच करु शकते. मागील अनेक दिवसांपासून ह्या स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर येत होती. आणि आता नुकत्याच रिलीज झालेल्या एका नवीन टीजरमध्ये असे सांगण्यात आले आहे की, विवो X7 स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, हेलिओ X25 प्रोसेसर आणि 6GB रॅम असेल. हा फोन हेलिओ X25 प्रोसेसर आणि फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज असेल. ह्या फोनमध्ये समोरच्या बाजूस होम बटनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर असेल.
ह्या नवीन टीजरमध्ये हा फोन १६ मेगापिक्सेलच्या फ्रंट फेसिगं कॅमे-यासह येईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर ह्या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असला. तर हा फोन कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात जास्त रिझोल्युशन असलेला फ्रंट फेसिंग कॅमेरा फोन असेल.