Realme C35 स्मार्टफोनमध्ये नवीन सिस्टम अपडेट जारी, बग फिक्स आणि सिक्युरिटी पॅच देखील समाविष्ट
Realme C35 मध्ये नवीन अपडेट जारी
मे सिक्युरिटी पॅचसह नवीन अपडेट
जाणून घ्या Realme C35 ला मिळालेल्या नवीन अपडेटमध्ये काय आहे
Realme ने भारतात आपल्या C35 स्मार्टफोनसाठी नवीन अपडेट जारी केले आहे. अपडेटमध्ये काही ऑप्टिमायझेशन आणि फिक्ससह Android सिक्युरिटी पॅचचा देखील समावेश आहे. अपडेट RMX3511_11.A.33 व्हर्जन नंबरसह येतो. अधिकृत चेंजलॉग सूचित करतो की, अपडेट इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी आणि इश्यू फिक्ससह येईल. अपडेटमध्ये मे 2022साठी Android सिक्युरिटी पॅच देखील मिळतोय.
हे सुद्धा वाचा : आधार केंद्रात जाण्याची गरज नाही, आता घरबसल्या अपडेट होणार तुमचे आधार कार्ड
Realme ने सांगितले की, या अपडेटची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी, यात टप्प्याटप्प्याने रोलआउट असेल. हे अपडेट सध्या मर्यादित वापरकर्त्यांसाठी आणले जाईल आणि कोणतेही महत्त्वपूर्ण बग नाहीत याची खात्री केल्यानंतरच काही दिवसांत ते अधिक विस्तृत करण्यात येईल. अपडेट्स तपासण्यासाठी यूजर्स सेटिंग्जमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेटमध्ये जाऊन माहिती मिळवू शकतात.
REALME C35 चे स्पेसिफिकेशन्स
Realme C35मध्ये FHD+ रिझोल्यूशनसह 6.6-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो 600 nits पीक ब्राइटनेस आणि वॉटरड्रॉप नॉचसह येतो. फोनमध्ये, तुम्हाला V-कट नॉच मिळत आहे, जिथे तुम्हाला 8MP सेल्फी स्नॅपर दिसणार आहे. तथापि, फोनच्या मागील बाजूस, तुम्हाला 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह टॅग केलेला 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिसेल.
तुम्ही तुमच्या चेहऱ्याने किंवा साइड-माउंट केलेल्या रीडरवर फिंगरप्रिंट स्कॅन करून डिव्हाइस अनलॉक करू शकता. याशिवाय, तुम्हाला फोनमध्ये Android वर आधारित Realme UI मिळत आहे. फोनमध्ये Unisoc Tiger T616 SoC मिळत आहे, एवढेच नाही तर तुम्हाला फोनमध्ये LPDDR4x रॅम, UFS 2.2 स्टोरेज आणि 5000mAh बॅटरी देखील मिळत आहे. ही बॅटरी 18W चार्जिंग सपोर्टसह येते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile