Smartphones launched In November 2024: नुकतेच लाँच झाले नवे जबरदस्त स्मार्टफोन्स, पहा यादी
नोव्हेंबर 2024 मध्ये अनेक आश्चर्यकारक स्मार्टफोन भारतात लाँच झाले.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने अलीकडेच आपला नवा बजेट 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला
Realme GT 7 Pro हा Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह येणारा हा फोन भारतातील पहिला हँडसेट आहे.
Smartphones launched In November 2024: या वर्षीच्या शेवटच्या डिसेंबर महिन्याला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, नोव्हेंबर 2024 मध्ये अनेक आश्चर्यकारक स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, फ्लॅगशिप आणि बजेट रेंजचे स्मार्टफोन नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोन्समध्ये उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नुकतेच लाँच झालेल्या स्मार्टफोन्सची यादी पहा-
Also Read: आत्ताच बजेट प्लॅन करा! भारतात लाँचपूर्वीच आगामी iQOO 13 ची किंमत Leak, मिळतील Powerful फीचर्स
Oppo Find X8 Series
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo चा नवा Oppo Find X8 फ्लॅगशिप स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. या सिरीजची सुरुवातीची किंमत 69,999 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 6.59 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. तसेच, या सिरीजमधील प्रो व्हेरिएंट 6.78 इंच लांबीच्या डिस्प्लेसह येतो. यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मुख्य कॅमेरा आणि 5910mAh बॅटरी देखील आहे. तसेच, प्रो व्हेरिएंटमध्ये 50MP मुख्य आणि 5630mAh बॅटरी आहे. डिव्हाइस 80W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.
Redmi A4 5G
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi ने अलीकडेच आपला नवा बजेट 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या Redmi फोनची किंमत 8,499 रुपयांपासून सुरू होते. या Redmi स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसह 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. तसेच, हा फोन 6.88 इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50MP AI रिअर कॅमेरा आणि Snapdragon 4s Gen 2 5G प्रोसेसर आहे. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5160mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Realme GT 7 Pro
Realme GT 7 Pro हा स्मार्टफोन नुकतेच लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत 59,999 रुपयांपासून सुरू होते. फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह येणारा हा फोन भारतातील पहिला हँडसेट आहे. त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो. यात 50MP मुख्य आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे.
Vivo Y300 5G
Vivo ने नुकतेच भारतात Vivo Y300 5G फोन लाँच केला आहे. Vivo च्या या हँडसेटची किंमत 21,999 रुपयांपासून सुरू होते. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या Vivo स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चिपसेट आणि 50MP मुख्य कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, या हँडसेटमध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile