New Smartphones launched: नुकतेच लाँच झालेले प्रसिद्ध कंपन्यांचे जबरदस्त स्मार्टफोन्स, किंमत 20 हजार रुपयांअंतर्गत। Tech News 

New Smartphones launched: नुकतेच लाँच झालेले प्रसिद्ध कंपन्यांचे जबरदस्त स्मार्टफोन्स, किंमत 20 हजार रुपयांअंतर्गत। Tech News 
HIGHLIGHTS

मार्च महिन्यातील हा आठवडा स्मार्टफोन्सच्या नावावर होता.

Lava O2 स्मार्टफोन या यादीत बजेट रेंजमध्ये येणार फोन आहे.

पुढील सर्व फोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर करण्यात आले आहेत.

मार्च महिना सुरु झाल्यापासून अनेक नव्या Smartphones ने भारतात हजेरी लावली आहे. या महिन्याचा तिसरा आठवडा नुकताच संपला आहे. हा आठवडा स्मार्टफोन्सच्या नावावर होता. या आठवड्यात बजेट रेंजपासून ते मिड रेंजपर्यंतचे काही स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहेत. Realme Narzo 70 Pro 5G, Vivo T3 5G आणि Lava O2 फोन या यादीत समाविष्ट आहेत. तर, देशी कंपनीचा Lava O2 स्मार्टफोन हा या यादीतील बजेट-अनुकूल पर्याय आहे. लक्षात घ्या की, पुढील सर्व फोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतही सादर करण्यात आले आहेत. बघुयात यादी-

Realme Narzo 70 Pro 5G

Realme NARZO 70 Pro 5G Features
Realme NARZO 70 Pro 5G Features

Realme Narzo 70 Pro 5G स्मार्टफोन 19 मार्च रोजी भारतात लाँच करण्यात आला होता. या फोनची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये आहे, ज्यामध्ये हा फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटसह येतो. Realme च्या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP Sony IMX890 सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Lava O2

Lava O2 Specs and Features
Lava O2 Specs and Features

Lava O2 स्मार्टफोन 23 मार्च रोजी भारतात लाँच झाला होता. वर सांगितल्याप्रमाणे, हा फोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 7,999 रुपये आहे, ज्यामध्ये फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. लावा फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. याशिवाय, फोन UNISOC T616 ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनची बॅटरी 5000mAh आहे.

Vivo T3 5G

vivo t3 5g smartphones

Vivo T3 5G स्मार्टफोन 21 मार्च रोजी भारतात लाँच झाला होता. या फोनची सुरुवातीची किंमत 17,999 रुपये आहे. स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर Vivo फोन मध्ये 6.67 इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. याशिवाय फोन MediaTek Dimensity 7200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोन OIS सपोर्टसह 50MP Sony IMX882 सेन्सरसह येतो. यात 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP टेलिफोटो सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo