New Smartphones Launched in India: दिवाळीला खरेदी करा नवा स्मार्टफोन! पहा October 2024 मध्ये लाँच झालेले फोन्स

New Smartphones Launched in India: दिवाळीला खरेदी करा नवा स्मार्टफोन! पहा October 2024 मध्ये लाँच झालेले फोन्स
HIGHLIGHTS

भारतीय स्मार्टफोन बाजार जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन्स मार्केटपैकी एक आहे.

नवीनतम Lava Agni 3 फोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरू होते.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix चा पहिला फोल्डेबल फोन 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतो.

New Smartphones Launched in India: सर्वांना माहितीच आहे की, भारतीय स्मार्टफोन बाजार जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन्स मार्केटपैकी एक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, येथे दररोज एकापेक्षा जास्त स्मार्टफोन लाँच केले जातात. ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून प्रत्येक श्रेणीत स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहे. तुम्ही देखील या दिवाळीत तुम्ही नवीनतम स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर, तुम्ही ऑक्टोबर 2024 मध्ये लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सचा विचार करू शकता. पाहुयात यादी-

Lava Agni 3

agni 3 lava,lava agni 3 review,lava agni 3 camera,lava agni 3 features,agni 3,lava agni 3 first look,lava agni 3 specs,lava agni 3 price in india,lava agni 3 specifications,lava agni 3 5g review,lava agni 3 camera test,lava agni 3 specification,lava agni 3 launch,

नवीनतम Lava Agni 3 फोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरू होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, लेटेस्ट Lava Agni 3 स्मार्टफोन 6.78 इंच लांबीच्या AMOLED डिस्प्लेसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300X चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, 50MP+8MP+8MP ट्रिपल कॅमेरा सेटअप फोनमध्ये मिळेल. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, विशेषतः या फोनच्या मागील पॅनेलवर डिस्प्ले आहे.

Infinix Zero Flip

Infinix Zero Flip new smartphones in india
Infinix Zero Flip

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix चा पहिला फोल्डेबल फोन 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतो. हा फोन मागील आठवड्यात भारतीय बाजारात लाँच केला आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.9 इंच लांबीचा मुख्य डिस्प्ले आणि 3.64 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले असेल. उत्तम कार्यक्षमतेसाठी, MediaTek Dimensity 8020 चिपसेट देण्यात आली आहे. हा फोल्डेबल फोन 49,999 रुपयांना खरेदी करता येतो.

Samsung Galaxy A16 5G

Samsung Galaxy A16 5G
Samsung Galaxy A16 5G

Samsung Galaxy A16 5G हा स्मार्टफोन अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केला गेला आहे. हा फोन विशेषतः 6 वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेडसाठी सपोर्टसह येतो. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ सुपर AMOLED डिस्प्ले आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी या हँडसेट MediaTek Dimensity 6300 चिपसेटद्वारे समर्थित आहे. हा स्मार्टफोन 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध असेल.

Realme P1 Speed

Realme P1 Speed ​​5G
Realme P1 Speed ​​5G

Realme ने आपल्या पॉवर सिरीजमध्ये आणखी एक स्मार्टफोन समाविष्ट केला आहे. कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारात Realme P1 Speed फोनची धमाकेदार एंट्री केली. हा स्मार्टफोन 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. या फोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी प्लस 2.8D मायक्रो-वक्र OLED ई-स्पोर्ट्स डिस्प्ले आहे. स्पीड आणि परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करणारा Realme चा नवीन स्मार्टफोन MediaTek डायमेंशन 7300 चिपसेटच्या पॉवरने सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo