नवा Samsung Galaxy F05 फोन Powerful फीचर्ससह भारतात लाँच, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी

Updated on 18-Sep-2024
HIGHLIGHTS

नवा Samsung Galaxy F05 स्मार्टफोन भारतात लाँच

Samsung Galaxy F05 ची किंमत 7,999 रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy F05 ची विक्री 20 सप्टेंबरपासून Flipkart वर लाइव्ह होईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung चा नवा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. होय, या नव्या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy F05 फोन असे आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने याआधी नुकतेच भारतीय मार्केटमध्ये Samsung Galaxy M05 फोन लाँच केला आहे. कंपनीने हा फोन देखील बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. याशिवाय, हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. जाणून घेऊयात Samsung Galaxy F05 फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Samsung Galaxy F05 ची किंमत आणि उपलब्धता

नवा स्मार्टफोन Samsung Galaxy F05 ची किंमत 7,999 रुपये इतकी आहे. ही किंमत फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी निश्चित करण्यात आली आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 20 सप्टेंबरपासून Flipkart वर लाइव्ह होईल.

Samsung Galaxy F05 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नवीनतम स्मार्टफोन Samsung Galaxy F05 फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा LCD HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Helio G85 सर्वात लोकप्रिय मोबाइल गेमसाठी एक समाधानकारक गेमिंग अनुभव प्रदान करते. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच, हा फोन Android 14 आधारित One UI 6.1 वर कार्य करेल.

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. सोबत 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, कंपनीने फोनच्या बॉक्समध्ये चार्जर दिलेला नाही. चार्जिंगसाठी या फोनमध्ये USB Type-C चार्जर देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :